घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिकांवर छापे

नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिकांवर छापे

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात आयकर विभागा कडून मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वे शहरातील बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाचा निशाणा असल्याचे समोर येत आहे. शहरातील मोठ्या बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने आज सकाळी अचानक छापे मारत दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.

मागील काही महिन्यात महाराष्ट्रासह देशभरामध्ये आयकर विभागाच्या मार्फत विविध ठिकाणी छापेमारी करत करबुडव्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. याचाच भाग म्हणून नाशिक शहरासह जिल्ह्यातील मोठ्या बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयांवर आज सकाळी आयकर विभागाने छापे मारत अनेक दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील एकूण 30 ते 50 बड्या व्यावसायिकांवर आयकर विभागाची बारीक नजर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील नाशिक शहरातील काही बांधकाम व्यवसायिकांवर आज सकाळी अचानक छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

मागील काही महिन्यात आयकर विभागाने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, संभाजीनगर, जालना, नागपूर, सोलापूर अशा शहरांमध्ये धडक कारवाई करत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे मारत कारवाई केली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणून नाशिक मध्ये झालेल्या या कारवाईकडे बघितले जात आहे. आयकर विभागाने मारलेल्या छाप्यानंतर मोठ्या प्रमाणात दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच कार्यालय सील करण्याची देखील कारवाई केली जाऊ शकते नेमकं या छाप्यांमधून मिळालेल्या दस्तऐवजातून काय बाहेर येतं व त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -