घरदेश-विदेशBig News : शरद पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

Big News : शरद पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

Subscribe

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवत पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोघांचीही पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवत पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोघांचीही पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यावेळी सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगानंद शास्त्री, के.के. शर्मा, फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी देण्यात आली नाही. ज्यानंतर अजित पवार यांनी कार्यक्रमातून लगेच काढता पाय घेतला.

यावेळी नवी दिल्लीत भाषण झाल्यानंतर शरद पवार यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करत सर्वांनाच धक्का दिला. या धक्कातंत्रामुळे राज्यात मात्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

कोणाकडे कोणती जबाबदारी?

प्रफुल्ल पटेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष या पदासोबतच त्यांना पाच राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश, गुजरात झारखंड, राजस्थान, गोवा हे पाच राज्य पक्षाकडून पटेल यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळे : खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी देत महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या जबाबदारीसह युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

सुनिल तटकरे : ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या जबाबदारीसह राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्यांक विभाग ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड : आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे आणि कायमच वादात असणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मिर आणि कर्नाटक राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे कामगार विभाग, एससी, एसटी आणि ओबीसी विभाग देण्यात आलेले आहेत.

याशिवाय डॉ. योगानंद शास्त्री यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर फैसल यांना तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ राज्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

शरद पवार यांच्या या घोषणेनंतर पक्षाच्या नव्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहे. याबाबतचे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -