Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कारवाईची मागणी

महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कारवाईची मागणी

Subscribe

सोशल मिडियावर महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माळी समाजातर्फे करण्यात आली आहे.

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माळी समाजातर्फे करण्यात आली आहे. जळगाव येथील कपील सरोदे या समाजकंटकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून माळी समाजासह बहुजन नागरीकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. माळी समाजातर्फे वरणगाव पोलिस ठाण्यात डीवायएसपी सुभाष नेवे यांना निवेदन देण्यात आले आहे.

हे केले निवेदन

कपील सरोदे या समाजकंटकाने २ डिसेंबर रोजी आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुकवर थोर समाजसुधारक महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तसेच ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील केली आहे. थोर समाजसुधारकांविषयी असे काही आक्षेपार्ह पोस्ट टाकणे चुकीचे आहे. ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने माळी समाजासह बहुजन समाजातील नागरीकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सोशलमिडियाच्या कायद्यानुसार त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी माळी समाजातर्फे करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -