घरमहाराष्ट्रपिंपरीत किरकोळ भांडणामधून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

पिंपरीत किरकोळ भांडणामधून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

Subscribe

किरकोळ भांडणामधून चौघांनी मिळून एका तरुणाला लाकडी दांडका आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ भांडणामधून चौघांनी मिळून एका तरुणाला लाकडी दांडका आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मधूबन कॉलनी येथे घडली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुबन कॉलनी, भोसरी येथे राहणारे राजेश हरिश्चंद्र सावंत (२८) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगत भैरू सावंत वय (३२), नितीन भैरून सावंत (२७), नाथ शिंदे (२५) आणि कन्या शिंदे (२६) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांना अडवले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या लाकडी दांडके आणि लोखंडी रोडने जबर मारहाण केली आहे. यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जाणून घ्या कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -