घरमहाराष्ट्रMaratha Reservation : १६ मे रोजी राज्यात पुन्हा मराठा मोर्चा निघणार

Maratha Reservation : १६ मे रोजी राज्यात पुन्हा मराठा मोर्चा निघणार

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. राज्यातील लॉकडाऊन संपल्यावर १६ मे रोजी बीडमध्ये पहिला मोर्चा निघेल, अशी माहिती मराठा नेते आणि शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच गुरुवारी म्हणजेच आज मराठा समाजाची बीडमध्ये बैठक पार पडली. यावेळी मेटे यांच्यासोबत निवडक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी याआधी देखील मोर्चा निघाले होते. पण यावेळचा मोर्चा हा मुक मोर्चा नसणार आहे. असं विनायक मेटे म्हणाले . त्यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि आघाडी सरकारच्या नाकार्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे. या सरकारला ठिकाणावर आणण्याकरीता यााधी जसे मोर्चे काढण्यात आले होते, त्या प्रकारचं आंदोलन करण्याचा आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. लॉकडाऊन १५ तारखेला संपल्यानंतर बीडमध्ये मोरचा निघणार आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यायला हवा. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नाव ठेवून वेळ काढण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेणार? कसं आरक्षण देणार? हे आधी सांगा नंतर पोपटपंची करा, अशी भूमिका आम्ही घेणार आहोत,” असं विनायक मेटेंनी सांगितलं.

- Advertisement -

विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार

मराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील याचिकाकर्ते विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -