घरCORONA UPDATEcorona vacination : लसीकरणानंतर अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट करणे गरजेचे आहे का?

corona vacination : लसीकरणानंतर अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट करणे गरजेचे आहे का?

Subscribe

देशात कोरोना विषाणू वेगाने पसरत असून रुग्णसंख्या लाखोंचा पार गेली आहे. यात विषाणू पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे लक्षणे नसलेले रुग्ण असून हे कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरत आहेत. दरम्यान अनेकदा पॉझिटिव्ह असल्याचे रुग्णांना समजत नसल्याने एकामुळे अनेकांना प्रसार होत आहे. यात कोरोनाचा नव्या व्हेरियंटमुळे आरटीपीसीआर चाचणीही निगेटिव्ह येत आहे. अशावेळी अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट हा एकमेव पर्याय रुग्णाकडे असतो. अ‍ॅन्टिबॉडी टेस्टचे आयजीएम आणि आयजीजी असे दोन प्रकार आहेत. परंतु कोरोना रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट करणे गरजेचे असते का किंवा लसीकरणानंतरही अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट गरणे आवश्यक असते का याविषयी डॉक्टरांचे मत आहे जाणून घेऊ या..

यावर कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. एच. एम मार्डीकर सांगतात, व्यक्तीची हार्ड इम्युनिटी जाणून घेण्यासाठी आयजीजी अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट केली जाते. या अ‍ॅन्टिबॉडी टेस्टमध्ये न्युक्लिओकॅप्सिड आणि आरबीडी अॅन्टिबॉडीची टेस्ट होते. मात्र कोणती करायची हे सांगण्याचे काम डॉक्टरांवर अवलंबून असते. काही डॉक्टर कम्बाईन आरबीडी तर न्युक्लिओकॅप्सिड करण्याचा सल्ला देतात. दरम्यान या दोन्ही चाचण्यांमधून विषाणूची माहिती कळते.

- Advertisement -

दरम्यान अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट आणि लसीकरणानंतर करण्यात येणाऱ्या टेस्टाबाबत डॉक्टर सांगतात, अ‍ॅन्टिबॉडीमध्ये रक्ताला पोषक घटक असतात ज्य़ामुळे आपल्याला एखाद्या आजारातून सुरक्षा मिळते. उदा. कोरोना विषाणूने आपल्या शरीरात संक्रमण केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (अ‍ॅन्टिबॉडी) त्या रोगाविरोधात लढते. त्यामुळे आपल्या शरीरात जेवढ्या मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टिबॉडीस असतील तेवढ्य़ा प्रमाणात आपण विषाणूपासून वाचू शकतो. त्यामुळे लसीकरणानंतरही आपल्या शरीरात अ‍ॅन्टिबॉडीस तयार होतात. ज्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखले जाते. यात आयजीजी अ‍ॅन्टिबॉडी कोरोना संसर्ग झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरारीत दिसून येते असून ती अनेक महिने शरारीत कायम राहते. मात्र लसीकरणानंतर अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट करणे गरजेचे नसल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.


तर लसींवरही परिणाम होऊ शकतो, पूनावालांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी हायकोर्टात याचिका


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -