घरताज्या घडामोडीमराठा आरक्षण : मुक आंदोलनात आमदार-खासदारांनी बोलायचं, संभाजीराजेंनी सांगितले आंदोलनाचे स्वरुप

मराठा आरक्षण : मुक आंदोलनात आमदार-खासदारांनी बोलायचं, संभाजीराजेंनी सांगितले आंदोलनाचे स्वरुप

Subscribe

पहिला जोर लॉंग मार्च असेल आणि पुण्यापासून ते मंत्रालयापर्यंत असणार

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहोतच परंतु ते मुक आंदोलन आहे. त्यादिवशी मी काहीही बोलणार नाही कोणीही बोलणार नाही परंतु एक वाक्य जरुर असेल ते म्हणजे “समाज बोललंय, आम्ही बोललोय आता तुम्ही प्रतिनिधींनी बोलावं लागतंय” या आंदोलनात शाहु महाराजांचा पुतळा मध्ये असेल एका बाजूला सगळे समन्वय असणार त्याच्यासोबत मी असणार, मागच्या बाजूला राज्याचे समन्वयक बसणार त्याच्या मागे ज्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे त्यांना बसवणार, सारथीचे मुलांना बोलवणार, उजवीकडे आमदार, खासदार आणि मंत्री असणार आहेत. त्या दिवशी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी बोलायचे आहे असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

आमदारांनी जबाबदारी काय घेणार सांगायचे

आमदार, खासदरांनी फक्त बोलायचे नाही तर जबाबदारी काय घेणार हे सांगायचे आहे. ते जे काही बोलतील तेच त्यांना विधानभवनात अधिवेशनादरम्यान बोलावे लागणार आहे. असे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे. या सरकारने कधीही दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा असे राजेंनी म्हटले आहे. तो पहिला जोर लॉंग मार्च असेल आणि पुण्यापासून ते मंत्रालयापर्यंत असणार आहे. ही परिस्थिती आणू नका असेही राजेंनी म्हटले आहे. ३६ जिल्ह्यांचे मुक आंदोलन पहिले कोल्हापुरमधून सुरु होणार आहे. आमदार खासदारांनी बोलायचे आहे. पहिले पाच स्थळ कोल्हापुर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर आणि रायगड असे ५ विभाग आहे. पुढची दिशा समन्वयक ठरवतील. या आंदोलनानंतर लॉंग मार्चची प्लॅनिंग करणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मनात स्वार्थ घेऊन जाणार नाही

अराजकीय पुर्णपणे मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मनात स्वार्थ घेऊन जाणार नाही. कुठल्याही पक्षाची भूमिका घेणार नाही. कोणीही बोट दाखवेल अशी भूमिका घेणार नाही. इथं मोठ्या मोठ्या अभ्यासू व्यक्तींनी मतं मांडली आहेत. ज्यांना मत मांडता आले नाही त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले आहे आणि मराठा समाज सामाजिक मागास नाही हे सिद्ध केले. यामुळे आपण खुल्या प्रवर्गात बसलो आहे. जयंत पाटील आणि बाबा इंदुलकर यांनी चांगले मुद्दे मांडले आहेत. जस्टिस भोसले, महाधिवक्ता कुंभकोणी आणि मराठा समाजासाठी जे माजी एडव्होकेट थोरात आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन सेक्शन ९(११) घेता येतो का यावरही चर्चा करु असे आश्वासन संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे.

ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यावेळी दुर्दैवाने राजकीय पक्षातील लोकांनी एकमेकावर बोट दाखवले. कोण चुकले आहे यावर चर्चा झाली. सत्तेतील लोकांनी सांगितले एसईबीसीचा कायदा बोगस आहे तर विरोधकांनी म्हटले की, न्यायलयात मराठा आरक्षणावर बाजू मांडली नाही. परंतु आपल्याला चुका काढायचा नाहीत. चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी मार्ग सांगितला पाहिजे. तुम्ही काय करु शकता? समाजाला वेठीस धरु नका, हे राजकीय नेत्यांमध्येच खेळ सुरु झाला म्हणून आक्रमक भूमिका घेतली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी लक्ष केंद्रित करण्यासाठी समाजाला एकत्रित करण्यासाठी आणि हेतु स्पष्ट होण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे राजेंनी सांगितले. शरद पवार ते राज ठाकरे अशा सगळ्या नेत्यांना भेटलो आणि मराठा समजासाठी कसे एकत्र येऊ यावर चर्चा केली. मुंबईत मार्ग सांगितले. यामध्ये पहिला मार्ग राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करा असे सांगितले. जस्टिस भोसले यांनी अहवालात सांगितले की, क्युरिट पिटीशन करायची गरज नाही तर फक्त पुनर्विचार याचिका दाखल करण्याची गरज आहे. याला सहा महिने लागणार आहेत. ते नाही मिळाले तर दुसरा मार्ग म्हणजे ३(३८D) यामध्ये अयोग तयार करुन पुन्हा सामाजिक मागास सिद्द करुन राज्यपाल आणि राष्ट्रपती असा अहवाल जाणार आणि राष्ट्रपतींना पटले तर केंद्रीय आयोगाकडे जाईल केंद्रीय आयोगाला पटले तर राज्य सरकारला देतील मग ते संसदेत जाईल पण हे संसदेत कसे जाईल यावर चर्चा नंतर करु असे राजेंनी म्हटले आहे.

राज्य सरकारकडे ५ मुद्दे मांडले परंतु राज्य सरकारने काही केलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी राहुल शेवाळेंच्या माध्यमातून फोन केला होता. भेटून चर्चा करु असे म्हटले होते परंतु भेटल्यावर चर्चा होणार मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले की, मी भेटायला येणार नाही. भेटायला गेल्यावर मराठा समाजामध्ये चर्चा सुरु होणार त्यामुळे तुम्हाला द्यायचे असेल तर मागण्या मान्य केल्या असे जाहीर करा परंतु त्या मागण्या मान्य न केल्यामुळे ६ जूनला आक्रमक भूमिका घेतली असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

रायगडवरुन नाराजी व्यक्त केली आणि १६ जूनपासून कोल्हापुरमाधून मराठा आंदोलनाला सुरुवात करु अशी घोषणा केली. मी कोल्हापुरचा असल्यामुळे तिथून आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला नाहीतर राज्यातील मराठा समन्वयकांनी सांगितले की, कोल्हापुर शाहू महाराजांची भूमि आहे त्यामुळे ज्या कोल्हापुरातूनच मराठा आंदोलनाची सुचना व्हावी असे सगळ्यांचे मत आहे.

मराठा आरक्षणासाठी जी भूमिका घेणार त्यावरुन मी वाईटही होऊ शकतो परंतु जी भूमिका घेईल ती महाराष्ट्रासाठी आणि मराठा समाजाच्या हितासाठी घेणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. माझं उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांसोबत चांगले जमतं परंतु मी समाजाच्या भावनांकडे बघणार त्यावरच काम करणार असे राजेंनी म्हटलंय.

जबाबदारी ही समान्य मराठी माणसाची राहिली नसून पहिली खासदार संभाजीराजे छत्रपती यांची आहे. लोकांच्या कामासाठी राज्यसभेचा पगार घेतो आहे. दुसरी जबाबदारी उर्वरित खासदारांची आहे ते विधानसभेचे आणि जे विधानपरिषदेचे आहेत. तुम्ही समाजासाठी काय करणार आहात? त्यांना निवडून दिले आहे त्यांचा आदर करतो परंतु ते काहीही बोलले नाहीत. कोणीही मराठा समाजासाठी आले नाही कारण आपली वोट बँक खराब होईल मराठा समाजाला मदत केली तर बाकीचे नाराज होतील. असा घणाघात राजेंनी सगळ्या लोकप्रतिनिधींवर केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -