घरताज्या घडामोडीसाहित्य संमेलन : परखड मत मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं

साहित्य संमेलन : परखड मत मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं

Subscribe

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यवस्थेवर साधला निशाणा

नाशिक – आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. मात्र, आता तर देशद्रोही ठरवलं जातं, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर निशाणा साधला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून जावेद अख्तर यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर परखड मत मांडलं. ते म्हणाले की, साहित्य आणि राजकारण यांचं घनिष्ठ नातं आहे. मला मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असू, या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आणते, असं मतही त्यांनी यावेळी मांडलं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -