पवईच्या हिक्को पॅलेस मॉलला भीषण आग, लाखोंची सामग्री भस्मसात

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पवईतील एका शॉपिंग मॉलला भीषण आग लागली असून या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळीच सहा वाजण्याच्या सुमारास हिरानंदानी येथील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Massive fire breaks at powai hikko palace mall)

हेही वाचा – ठाण्यात सिनेमा स्टार मूवी थेटरच्या कॅफेट एरियाला आग

सकाळी सहा वाजता लागलेली आग अद्यापही धुमसतीच असून लेव्हल दोनची ही आग असल्याचं अग्शिशमन दलाकडून सांगण्यात आलंय. आग विझवण्यासाठी २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीत जीवितहानी झालेली नसली तरीही मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे. मॉलमधील लाखोंची सामग्री आगीत जळून खाक झाली आहेत.

सोमवारपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तुफान पाऊस आहे. त्यातच, बुधवारी सकाळी ही आग लागली. आगीची भीषणात सुरुवातीपासूनच अधिक होती, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.


दरम्यान काहीच दिवसांपूर्वी २९ जून रोजी पालघर येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये रात्री उशीरा भीषण आग लागली होती. कंपनीत आग लागल्यापासून सलग आठ मोठे स्फोट झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी जवान शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.