घरमहाराष्ट्रचित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 363 कोटी खर्च करणार - अनुरागसिंह ठाकूर

चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 363 कोटी खर्च करणार – अनुरागसिंह ठाकूर

Subscribe

अनुराग सिंह ठाकूर यांनी एफटीआयआयच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. एफटीआयआय आंतरराष्ट्रीय तोडीचे करण्याच्या दृष्टीकोनातून यावेळी चर्चा झाली.

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संरक्षण आणि प्रसार यांना प्राधान्य दिले पाहिजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आहे आणि चित्रपट हे या वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे प्रतिपादन माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले. अनुराग सिंह ठाकूर यांनी गुरूवारी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेटी दिली. यावेळी ते बोलत होते. एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, एफटीआयआयचे संचालक संदीप शहारे आणि संस्थेचे इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते

अनुराग सिंह म्हणाले की, आपल्या चित्रपटसृष्टीच्या वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि डिजिटायजेशन करणे हा 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा उद्देश आहे. या मिशनच्या एकूण 597 कोटी रुपये तरतुदीपैकी 363 कोटी रुपये निव्वळ पुनरुज्जीवनावर खर्च करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी एक असेल. चित्रपट हे आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि गेल्या 100 वर्षात चित्रपट उद्योगाने दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे भारत जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग बनला आहे.

- Advertisement -

या अभियानांतर्गत 5900 हून अधिक लघुपट, माहितीपट आणि फीचर्स यांचे जतन आणि त्यांना मूळ स्वरूपात राखण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एनएफएआय द्वारे सुरू असलेली ही प्रक्रिया जगातील सर्वात मोठ्या जीर्णोद्धार, संवर्धन, जतन आणि डिजिटलायझेशन प्रक्रियेपैकी एक आहे अशी त्यांनी माहिती दिली. पुनरुज्जीवन प्रक्रियेमध्ये लघुपट, फीचर्स, विविध भारतीय भाषांमध्ये बनवलेले माहितीपट यासह अनेक चित्रपटांचा समावेश असल्याचीही माहिती त्यांनी दिली.  सरकारने ही जबाबदारी एका मिशन मोडमध्ये घेतली आहे आणि आगामी पिढ्यांसाठी हा मौल्यवान चित्रपट वारसा , पुनरुज्जीवीत आणि संग्रहित करण्याकरिता नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

अनुराग सिंह ठाकूर यांनी एफटीआयआयच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. एफटीआयआय आंतरराष्ट्रीय तोडीचे करण्याच्या दृष्टीकोनातून यावेळी चर्चा झाली. एफटीआयआय ही भारतातली  प्रतिष्टीत  संस्था आहे.  दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात एफटीआयआयला आणखी पुढे कसे नेता येईल यावर तसेच अनिमेशन, गेमिंग, आणि कॉमिक्स मध्ये एफटीआयआयला कसे प्रोत्साहन देण्याबाबतही या आढावा बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट संस्थासमवेत सहयोग केल्याने विद्यार्थ्यांची कथा सांगण्याची क्षमता वृद्धिगत होईल असे त्यांनी सांगितले. एफटीआयआयने उद्योजकता कौशल्याची जोपासना करत चित्रपट आणि दूरचित्रवाणी  क्षेत्रात स्टार्ट अप्स साठी विद्यार्थ्यांना सज्ज करावे असेही त्यांनी सुचवले.  आपल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला आकार देत त्यांना रोजगार मिळवणारे ऐवजी त्यांना उद्योजक म्हणून घडवता येईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाकूर यांनी एफटीआयआयचे शैक्षणिक नियतकालिक “लेन्ससाइट” च्या हिंदी आवृत्तीचेही प्रकाशन केले. विभाग प्रमुखांशी संवाद साधताना, मंत्र्यांनी  प्राध्यापकांना स्वतःला अपग्रेड करत राहण्याचे आणि उद्योग क्षेत्रातून  एफटीआयआयमध्ये भागीदार आणण्याचे आवाहन त्यांनी केले.  देशाच्या विविध भागात चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्मितीचे अभ्यासक्रम चालवण्यासाठी संस्थांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात त्या भागात पोहोचण्याच्या उपक्रमांवर आणि भागीदारीवरही त्यांनी भर दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -