घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या 'बारामती'वर भाजपची नजर; मोदी-शहांनी रणनीती आखली

शरद पवारांच्या ‘बारामती’वर भाजपची नजर; मोदी-शहांनी रणनीती आखली

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीत भाजपाने जोर लावायला सुरुवात केली आहे.

राज्यातील सत्तासमीकरण गेल्या काही दिवसांपासून वेगाने बदलत आहेत. अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. राज्यातील सत्ता उलथवून लावण्यास भाजपाला यश मिळाले. दरम्यान, भाजपा आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या क्षेत्रातही जोर वाढवला असल्याचं ते म्हणाले. (Maharashtra preparation for general election from now on bjp eyes on ncp leader Sharad Pawar field)

हेही वाचा – नव्या मंत्र्यांसाठी पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता, नवी तारीख कोणती?

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजपा सध्या १६ खासदारांच्या जागेवर लक्ष केंद्रीत करत आहे. यामध्ये खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघही येतो. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीने शिवसेनेतील बंडखोर खासदारही अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीतही भाजपाने जोर लावायला सुरुवात केली आहे.”

हेही वाचा – मोठी बातमी! आशिष शेलार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार?, चंद्रकांतदादा कॅबिनेटमध्ये

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, “जे पक्ष युतीमध्ये आमच्यासोबत असतील त्यांनाही आम्ही संधी देणार आहोत. दरम्यान, या १६ जागांमध्ये बारामतीचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्हाला बारामती येथे चांगली मते मिळाली. त्यामुळे तो मतदारसंघही सध्या आमच्या यादीत आहे. या जागांसाठी आम्ही काही केंद्रीय नेत्यांना प्रभारी नियुक्त केलं आहे. त्यानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना बारामती हा मतदारसंघ दिला असून त्या सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येणार आहेत.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -