घरक्राइमMLA Shyamsunder Shinde : घरातून २५ लाख रूपयांची रोकड लंपास; ३० लाखांची...

MLA Shyamsunder Shinde : घरातून २५ लाख रूपयांची रोकड लंपास; ३० लाखांची खंडणी

Subscribe

 

मुंबईः नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे MLA Shyamsunder Shinde आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. आमदाराच्या चालकाने त्याच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केली आहे. या दोघांनी आमदाराच्या घरातून तब्बल २५ लाख रूपयांची रोकड लंपास केली असून आमदारांकडे ३० लाखांची खंडणी देखील मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करुन ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

MLA Shyamsunder Shinde आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे स्वीय सहायक प्रमोद शिंदे (३२) यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, यातील आरोपी चक्रधर मोरे हा आमदार शिंदे यांच्याकडे चालक म्हणून नोकरी करत होता. त्याने आमदार शिंदे यांच्या ना. म. जोशी मार्ग येथील अपोलो मिल कम्पाउंडमध्ये असलेल्या लोढा बैलौसिमो को-ऑप हौ. सोसायटीमधील ३९ व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असताना त्याचा मित्र अभिजीत कदम याच्या मदतीने तब्बल २५ लाख रूपयांची रोकड लंपास केली.

पैसे चोरी केल्यानंतर चालक मोरे हा कोणालाही काहीही न सांगता निघुन गेला. पुढे त्याने आमदार शिंदे यांच्याकडे ३० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम १ जूनपर्यंत त्याच्या पत्नीकडे न दिल्यास रायगडावर जावून स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करेन. तसेच, सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. १ एप्रिल ते ७ मे दरम्यान ही सर्व घटना घडल्याचे आमदार शिंदे यांचे स्वीय सहायक प्रमोद शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

 

राज्यसभा निवडणुकीत झाला होता आरोप

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. पराभवावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी बविआचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचे नाव घेत त्यांनी मतदान केले नाही, असा आरोप केला. त्यात नांदेड जिल्ह्याती लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे नाव होते. यानंतर आता श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे म्हणाले, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका आहे. मी संजय राऊत यांच्याशी संपर्क केला नाही. मी त्यांना भेटणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सहयोगी आमदार आहे. आज महत्व वाढले हे नक्की आहे. शिवसेनेने मला विचारले तर मी सांगेन काय नाराजी आहे ते. जे आरोप केले ते परत परत सांगायची गरज नाही. ते गुप्त मतदान होते. त्यामुळे कुणी मत दिले ते कुणी सांगू शकणार नाही. आता विधान परिषदेत विजय कुणाचा होणार हे मी सांगू शकत नाही. मी काही भविष्य सांगणारा नाही, अशा शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -