घरताज्या घडामोडीMLC Election Result 2021: काँग्रेसच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली, विजयानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

MLC Election Result 2021: काँग्रेसच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली, विजयानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडी सरकारचे १६ मत फोडण्यात भाजपला यश आलं आहे. मतदारांनी मतदान करुन निवडल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले आहेत. तर थेट काँग्रेसवर घणाघात केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला पक्षांतर्गत असलेल्या अस्वस्थपणाचा फटका बसला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीला ज्यांनी पहिली पसंत दाखवत मतदान केले त्यांचे आभार आणि दुसऱ्या पसंतीचे मत मिळाले त्यांचाही आभारी असल्याचे सांगितले. तसेच भाजपकडे ३१८ मत होती परंतु ३६२ मतं मिळाली आहेत. नागपूरमधील जिल्ह्यातील मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं त्यामुळे हा विजय मिळाला आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी-शिवसेनेनी साथ दिली नसती तर काँग्रेस….

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. महाविकास आघाडीला जी १८६ मतं मिळाली जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं साथ दिली नसती तर काँग्रेसला १८६ मतं मिळाली नसती. काँग्रेसमध्ये प्रचंड अफरातफरी असून हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवणे हेच याचे कारण आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हुकूमशाही पद्धतीने एका उमेदवाराला मतदान करायला लावले आणि दुसऱ्या उमेदवाराला उभे केले हे मतदारांना मान्य नव्हते, काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. याचा फटका काँग्रेसला बसला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

छोटू भोयर यांना १ मत

काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आली परंतु ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आला. परंतु छोटू भोयर यांना १ मत मिळाले आहे. छोटू भोयर यांनी स्वःला मतदान केलं आहे. त्यांनीसुद्धा दुसऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं नाही. मंत्री त्यांचे ऐकत नाही त्यामुळे हा नाना पटोले यांचा पराभव असल्याचा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

- Advertisement -

निवडणूक मतदान आकडेवारी

जनतेचा भाजपला कौल हा शिवसेना पक्षश्रेष्ठींना संदेश – रावसाहेब दानवे

नागपुर आणि अकोला या दोन्ही ठिकाणी उमेदवार दणदणीत विजयी झाले आहेत. राज्यामध्ये धोका देऊन जे सरकार शिवसेनेने बनवलं, त्या शिवसेनेवर लोकांचा भरवसा राहिलेला नाही, हा त्याचा स्पष्ट अर्थ निघतो. आमची मत ठरलेली होती. या निवडणूकीत ४८ मत जास्त मिळाली. त्यांच्यात पक्षातील लोकांनी मतदान केलेले आहे. त्यांच्या पक्षातील लोकांनी मतदान करणे, म्हणजे सरकारचा कारभार राज्यात चांगला सुरू नाही, हा स्पष्ट संदेश यामधून पक्षश्रेष्ठींना देण्यात आला आहे. अकोला, वाशिममध्ये शिवसेनेविरोधात कौल जनतेने दिला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की जनता दगाफटका देऊन सत्तेत आलेल्या सरकारवर खुश नाहीए. मतदान करणारे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक आहेत. महापालिकेचे लोक आहेत. महापालिकेच्या निवडून आलेल्या लोकांनी सरकारवर अविश्वास दाखवला, हा निवडणूकीच्या आधीच इशारा आहे. येणाऱ्या महापालिका निवडणूकांमध्ये हे सगळे एकत्र येऊद्यात पण भाजप स्वबळावर जिंकल्याशिवाय राहणार नाही असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : नागपूरमध्ये भाजपनं गड राखला, चंद्रशेखर बावनकुळे १७६ मतांनी विजयी, खंडेलवाल अकोल्यातून विजयी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -