घरमहाराष्ट्रपुणेMNS : लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले, 'राज साहेब देतील...

MNS : लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले, ‘राज साहेब देतील ती जबाबदारी…’

Subscribe

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी पुणे जिल्ह्याची जबाबदारी मुलावर म्हणजेच मनसेचे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे यांना दिली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (MNS: Amit Thackeray’s clear answer on the question of contesting the Lok Sabha elections)

हेही वाचा… MNS : “हा धमाका म्हणूनच…”, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (ता. 23 फेब्रुवारी) पुणे विद्यापीठावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अमित ठाकरे यांनी केले. या मोर्च्यात अमित ठाकरे यांच्या मातोश्री आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या. या मोर्चामध्येच अमित ठाकरे यांना पत्रकारांनी निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, राज साहेबांनी जबाबदारी दिली तर मी ते म्हणतील ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. त्यांनी म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक पण होईल. सरपंच ही होईल. पुण्यातून लोकसभा लढवणार आहे. पण माझी स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अमित ठाकरे खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच, मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही. तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही अमित ठाकरे यांनी यावेळी दिला. विद्यापीठात मराठी भाषा भवन निर्माण करावे, वसतिगृहातील मुलांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे आणि वसतीगृहात सुधारणा करण्यात याव्या, अशी मागणी अमित ठाकरे यांच्याकडून मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडाळाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते. यानंतर अमित ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये चांगल्या सोय करून द्यायला नेमकी काय अडचण आहे? हे कळू शकले नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -