घरमहाराष्ट्रपुणेMNS : "हा धमाका म्हणूनच...", अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा

MNS : “हा धमाका म्हणूनच…”, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा

Subscribe

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने मोर्चा काढला होता.

पुणे : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. बहरों को सुनाने के लिए धमाके की जरुरत है, असे म्हणत अमित ठाकरे यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना सुनावले आहे. आजच्या या मोर्चासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने जमा झाले होते. पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते गजानन काळे, शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. (MNS march on Pune University under the leadership of Amit Thackeray)

हेही वाचा… Manohar Joshi : कायदेमंडळाच्या चारही सभागृहांचे प्रतिनिधित्व करणारा नेता, मोदींकडून शोकसंवेदना

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (ता. 23 फेब्रुवारी) पुणे विद्यापीठावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अमित ठाकरे यांनी केले. या मोर्च्यात अमित ठाकरे यांच्या मातोश्री आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या. चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा मोर्चा होता. मोर्चा विद्यापीठाच्या गेटवर धडकल्यानंतर तिथे तो आडवण्यात आला. परंतु, अमित ठाकरे यांनी विद्यापीठात जात कुलगुरुंची भेट घेतली.

विद्यापीठात मराठी भाषा भवन निर्माण करावे, वसतिगृहातील मुलांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे आणि वसतीगृहात सुधारणा करण्यात याव्या, अशी मागणी अमित ठाकरे यांच्याकडून मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडाळाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते. यानंतर अमित ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये चांगल्या सोय करून द्यायला नेमकी काय अडचण आहे? हे कळू शकले नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांसमोर ते म्हणाले की, विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थीनीपर्यंत पोहोचण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेला विद्यार्थ्यांच्या युनिटची गरज होती. परंतु ते होऊ शकले नाही. ज्यामुळे आजचे हे आंदोलन करावे लागले आहे. अनेक प्रश्न असे आहेत, जे तिथल्या तिथे सोडवता येऊ शकतात, मात्र सत्ता नसल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे आजचे हे आंदोलन “बहरों को सुनाने के लिए धमाके की जरुरत है” अशा प्रकारचे असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. आमच्या या धमाक्यामुळे त्यांचे कान आणि डोळे उघडले आहेत.

1949 चे विद्यापीठ आहे. त्यामुळे तेव्हापासून ते आजपर्यंत आपण मेसचे जेवण चांगले नाही म्हणून भांडत आहोत. मेसच्या जेवणात झुरळ, दगड सापडत असल्याचे फोटोही यावेळी त्यांच्याकडून दाखवण्यात आले. मेसच्या किचनची, हॉस्टेलमधील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाल्याचे फोटोही अमित ठाकरेंनी प्रसार माध्यमांना दाखवले. जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बाजूला असलेल्या मठातून मिळणाऱ्या जेवणार आपला दिवस काढावा लागत असल्याचे अमित ठाकरेंना विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे एवढ्या मोठ्या विद्यापीठात जर का जेवण मिळत नसेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे सांगत अमित ठाकरेंनी विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात आपला मनःस्थाप व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -