Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्यातील पोलिसांना दिवाळी बोनस द्यावा; अमित ठाकरेंची पत्राद्वारे फडणवीसांकडे मागणी

राज्यातील पोलिसांना दिवाळी बोनस द्यावा; अमित ठाकरेंची पत्राद्वारे फडणवीसांकडे मागणी

Subscribe

यंदा रेल्वे महापालिका बेस्ट कर्मचाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. मात्र, अद्यार पोलिसांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला नाही. दिवस-रात्र राज्यातील जनतेला सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे.

यंदा रेल्वे महापालिका बेस्ट कर्मचाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. मात्र, अद्यार पोलिसांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला नाही. दिवस-रात्र राज्यातील जनतेला सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे पोलिसांना दिवाळी बोनस जाहीर करावा अशी, मागणी केला आहे. (MNS Leader Amit Thackeray letter To DCM Devendra Fadnavis For Police Diwali Bonus)

मनसे नेते अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलिसांनी दिवाळी बोनस द्यावा अशी मागणी केली आहे. “पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील….. फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील… पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय”, असे अमित ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

अमित ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्टया मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त १२ ते १५ तास ! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते !

- Advertisement -

हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील….. फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील… पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय.

माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षापासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी.


हेही वाचा – एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना सरसकट 5000 रुपये दिवाळी बोनस जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -