घरदेश-विदेशModi Sarkar 2.0 : 'आमच्या साहेबांना मोदीजी करणार का मंत्री ?'

Modi Sarkar 2.0 : ‘आमच्या साहेबांना मोदीजी करणार का मंत्री ?’

Subscribe

भाजपा खासदारांच्या कार्यकर्ते आणि नातलगांमध्ये उत्सुकता

आज सायंकाळी भाजपाचे संसदीय पक्षनेते नरेंद्र मोदी आपल्या सहकाऱ्यांसह शपथ घेणार असून सध्या दिल्लीत त्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे सकाळपर्यंत या ‘मोदी २.०’ मध्ये कोणाचा समावेश असणार याबद्दल केवळ तर्क वितर्क केला जात आहे. माध्यमांमधून काही नावे चर्चेत येत असली तरी खासदारांच्या जवळच्या व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनाही याबद्दल खात्रीशीर माहिती मिळत नाहीये. मात्र ‘मोदी आमच्या साहेबांना मंत्री करणार का? असा प्रश्न त्यांनाही सतावतो आहे.

नरेंद्र मोदी संभाव्य मंत्र्यांना बुधवारी रात्री फोन करून त्यांच्या मंत्री मंडळ सहभागाबद्दल सांगणार असल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक इच्छूकांना आपल्याला फोन येईल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. त्यापैकी अनेकांना आज सकाळपर्यंत फोन आले नव्हते. परिणामी आपल्याला मंत्रीपद मिळणार की नाही? याबद्दल त्यांच्या मनात धाकधूक होती.

- Advertisement -

आपल्या साहेबांना दुपारपर्यंत मंत्रीपदासाठी बोलावणे आले, तर आपणही शपथविधीसाठी हजर असावे यासाठी आज सकाळीच भाजपा खासदारांच्या जवळचे कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले. परिणामी औरंगाबाद, शिर्डी येथील विमानतळावर आज सकाळी राजकीय कार्यकर्ते आणि नातलगांची गर्दी दिसून आली.

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते मुंबई आणि पुणे विमानतळावरून रवाना होत आहेत. शिर्डीच्या विमानतळावरून दिल्लीसाठी निघालेल्या एका नेत्याच्या जवळच्या नातलगाने ‘माय महानगर’ला सांगितले की अजूनतरी आमच्या साहेबांना शपथविधीचा निरोप आलेला नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे, की मोदीजी त्यांना बोलावतील. त्यामुळे ऐनवेळेस धावपळ नको म्हणून आम्ही कुटुंबिय आणि कार्यकर्ते दिल्लीकडे निघालो आहोत.’

- Advertisement -

दरम्यान अजूनही मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे अधिकृत जाहीर झालेली नाही. नावांतील हा ‘सस्पेंस’ शेवटपर्यंत टिकावा याची काळजी भाजपाकडून घेतली जात आहे. यासंदर्भात दिल्लीमधील एका खासदाराच्या जवळच्या कार्यकर्त्याने सांगितले की नावांबाबत इतकी गुप्तता पाळली गेलीय की भाजपातील मोठमोठ्या नेत्यांनाही त्याची माहिती नाही. त्यामुळे खासदारांनाही ही माहिती उशिराच समजेल अशी स्थिती आहे. दुसरीकडे शिवसेनेने मात्र त्यांच्या कोट्यातील नाव जाहीर केले असून अरविंद सावंत सेनेकडून शपथ घेतील अशी माहिती मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -