घरमहाराष्ट्रमोदी खोटे बोलतात

मोदी खोटे बोलतात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेथे जातात तेथे खोटे बोलतात. एक दिवस संपूर्ण देश ते विकून टाकतील. देशातील प्रत्येक मोठी कंपनी ते खासगीकरणाच्या नावाखाली अदानी-अंबानींच्या हवाली करत असून मोदी या उद्योगपतींचे लाऊड स्पीकर आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. वणीसह यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील शासकीय मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी जेथे जातात, तेथे खोटे बोलतात. ते कधी चंद्राची गोष्ट करतात, तर कधी कलम 370च्या विषयावर चर्चा करतात. ते अदानी-अंबानीचे स्पिकर बनून सामान्यांचे लक्ष विचलित करीत आहेत. सामान्यांचे लक्ष विचलित झाले की त्यांच्या खिशातून पैसे काढून ते अदानी-अंबानीच्या हवाली करत आहेत. शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नावर त्यांचे मौन असते. या देशाची अर्थव्यवस्था अदानी-अंबानी नाही, तर देशातील सर्वसामान्य गरीब नागरिक चालवित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, हे काँग्रेसचे ध्येयधोरण आहे.

- Advertisement -

परंतु नरेंद्र मोदींचा कारभार याऊलट सुरू असल्याचे राहुल गांधी म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदीजींनी देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील, असे आश्वासन दिले होते. ते मिळाले काय, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. सहा हजार रुपये भाव कापसाला दिला जात आहे काय, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारले. जनसमुदायाने त्यांच्या या प्रश्नाला प्रतिसाद देत एकसुरात नाही, असे उत्तर दिले.

यावेळी त्यांनी माध्यमांवरदेखील सडकून टीका केली. या देशातील प्रसारमाध्यमे केवळ नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात गुंतले आहेत. परंतु देश रसातळाला नेण्याचे काम करणार्‍या मोदींविरुद्ध माध्यमे एक शब्दही लिहायला व दाखवायला तयार नाहीत. ही सर्व प्रसारमाध्यमे देशातील करोडपती उद्योजकांच्या नियंत्रणात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -