घरमहाराष्ट्रदेशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात घालण्याचा मोदी यांचा चंग, ठाकरे गटाची टीका

देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात घालण्याचा मोदी यांचा चंग, ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : दोन हजारांची नोट (₹ 2000 Note) चालू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे दहशतवादाची कंबर तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची (Economy of India) कंबर तोडत आहेत. कारण मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही. हिंसाचार व दहशतवाद सुरूच आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2016च्या घातकी नोटाबंदीनंतर दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोट्यवधींचा खर्च झाला. तो सर्व खर्च पाण्यात गेला, असे ठाकरे गटाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

पहिल्या नोटाबंदीतून काडीचाही फायदा नाही
पहिल्या नोटाबंदीचा (Demonetisation) खटका पंतप्रधान मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दाबला. पाचशे आणि एक हजारच्या नोटा त्यांनी चलनातून बाद केल्या व एकच हाहाकार उडाला. मोदी रात्री आठ वाजता टीव्हीवर प्रकट झाले व दुसऱ्या दिवसापासून त्यांनी संपूर्ण देशाला ‘नोटा’ बदलण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे केले. त्या रांगेत देशभरात चार हजारांवर माणसे मरण पावली व नोटाबंदीचा काडीचाही फायदा झाला नाही. उलट लहान उद्योग, छोटे व्यापारी देशोधडीस लागले. नोकऱ्या गेल्या. काळा पैसा बाहेर येईल, असे मोदी म्हणाले. उलट काळा पैसा जास्तच वाढला. दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा नोटाबंदीमुळे थांबेल, असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात उलटेच झाले. मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली. त्यामुळे हजार-पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे, अशी विखारी टीका ठाकरे गटाने केली आहे.

राष्ट्रीय संपत्तीचे विश्वस्त असल्याचा विसर पडला
नोटा दोन हजारांच्या छापा नाहीतर पाच हजारांच्या, त्याने काय फरक पडतोय? डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांक पातळीवर कोसळला आहे. 85 रुपये एका डॉलरला ही स्थिती आहे. 10 वर्षांपूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना डॉलरची किंमत 45 रुपये होती, आज 85 रुपये झाली. ही आपली आर्थिक महासत्ता! मोदी अर्थव्यवस्थेशी निर्घृणपणे खेळत आहेत, हे गौतम अदानी प्रकरणातही दिसले. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम मोदींनी अदानी यांच्या खिशात टाकले. विमानतळांपासून बंदरांपर्यंत सर्व राष्ट्रीय संपत्ती आज गौतम अदानींची झाली. सार्वजनिक बँकांचा, एलआयसीसारख्या उपक्रमांचा पैसाही त्यांनी अदानींसारख्या मित्रांना दिला. आपण राष्ट्रीय संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत, याचा विसर त्यांना पडला आहे.

- Advertisement -

शिंदे गटावर निशाणा
ठाकरे गटाने यानिमित्ताने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 50 खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल. त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल. त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल इतकेच, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -