घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या हाती भाजपाचं पुस्तक, कारण...

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या हाती भाजपाचं पुस्तक, कारण…

Subscribe

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु यावर त्यांनी कुठलीही ठोस अशी माहिती किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, आता अमोल कोल्हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते म्हणजे एका ट्वीटमुळे… आज जागतिक पुस्तक दिन आहे. यानिमित्त कोल्हेंनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत कोल्हेंच्या हाती भाजपाचं पुस्तक दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

आज जागतिक पुस्तक दिन असून हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. परंतु कोल्हेंनी या दिनानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. तसेच एक कॅप्शनही दिलं आहे. पोस्टमधील पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे पुस्तक ‘नेमकची बोलणे’ हे आहे. तर दुसऱ्या फोटोत ‘द न्यू बीजेपी’ नावाचे पुस्तक दिसत आहे. तसेच विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?, अशा प्रकारचं कॅप्शन अमोल कोल्हेंनी या पोस्टला दिलंय. परंतु हा फोटो शेअर करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय?, हे अद्यापही अस्पष्ट आहे.

- Advertisement -

‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगाला संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, देशाचे पंतपधान नरेंद्र मोदी यांनी अमोल कोल्हे यांच्या एका भाषणाचं कौतुक केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यावेळी कोल्हे यांनी कराड येथे पत्रकार परिषद आयोजित करत महानाट्यासह राजकीय चर्चांना पूर्णविराम दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझं कौतुक केलं ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही एका पेपरमध्ये काम करत असताना, तुमच्या बातमीचं दुसऱ्या पेपरच्या संपादकांनी कौतुक केलं तर मी तुम्हाला विचारायचं का की तुम्ही नोकरी सोडताय?, कौतुकाला संधी कसं मानायचं?, आधी ऑफर तर यायला हवी. सध्या एकच ऑफर आहे, असं कोल्हे म्हणाले होते.

- Advertisement -

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असून २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुढील भूमिका काय असणार?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : पंतप्रधानांचं कौतुक ही आनंदाची गोष्ट पण…, खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -