घरताज्या घडामोडीक्रिकेटच्या मैदानात नवनीत राणांची फटकेबाजी, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

क्रिकेटच्या मैदानात नवनीत राणांची फटकेबाजी, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नेहमीच आपल्या राजकीय जीवनात चर्चेत असतात. यावेळी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर टीकेची फटकेबाजी करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी आज क्रिकेटच्या मैदानात उतरून जोरदार चौकार आणि षट्कारांसाठी जोरदार फटकेबाजी केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अमरावती शहरात असलेल्या वेलनेस सेंटरच्या उद्घाटनासाठी नवनीत राणा दाखल झाल्या होत्या. या ठिकाणी अंबिका नगरमध्ये काही तरुण क्रिकेट खेळत होते. तेव्हा राणांचं लक्ष क्रिकेट खेळत असलेल्या मुलांकडे गेले. त्यानंतर राणांनीही त्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. यावेळी राणांनी चांगलीच फटकेबाजी केली. क्रिकेट खेळताना खेळाडूकडून आऊट असं म्हटल्यावर नवनीत राणांनी आऊट नाही असं सांगितले. नवनीत राणा यांनी क्रिकेटमध्ये चांगलीच फटकेबाजी केली असून धावासुद्धा काढल्या.

- Advertisement -

नवनीत राणांकडून ठाकरे गटाला घेरण्याचं काम सध्या सुरू आहे. चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी राज्याची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महिलेला बसवायचं आहे, अशी घोषणा शिवशक्ती-भीमशक्तीच्या मेळाव्यात केली होती. त्यावेळीही नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. परंतु राणा दाम्पत्याविरोधात हनुमान चालिसा प्रकरणी वॉरंट निघाले असून त्यांना १४ तारखेपर्यंत न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, चार गंभीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -