घरताज्या घडामोडीShiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीनुसार मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असून, विद्यामान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Shiv Sena First list of candidates of Chief Minister Eknath Shinde Shiv Sena announced)

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आठ जणांच्या या यादीत सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यानुसार, मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे, रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – Shiv Sena First List : शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, खासदार श्रीकांत शिंदेचे नाव नाही

- Advertisement -

शिवसेनेच्या शिंदे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

  • मावळ- श्रीरंग बारणे
  • रामटेक- राजू पारवे
  • हातकणंगले – धैर्यशील माने
  • कोल्हापूर- संजय मंडलिक
  • हिंगोली – हेमंत पाटील
  • बुलढाणा – प्रतापराव जाधव
  • शिर्डी – सदाशिव लोखंडे
  • दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजित पवारांसह 37 जणांचा समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -