घरक्राइमSuicide : कोटामधून पुन्हा वाईट बातमी; NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Suicide : कोटामधून पुन्हा वाईट बातमी; NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Subscribe

कोटा : देशातील कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण काही थांबता दिसत नाही आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या सौम्या नावाच्या विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवले आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरातील ही सातवी आत्महत्या आहे. (Suicide News Again bad news from Kota Suicide of a student preparing for NEET)

हेही वाचा – Harish Salve : न्याय व्यवस्थेवर विशेष गटाचा दबाव; हरीश साळवेंसह 600 हून अधिक वकिलांचे CJI यांना पत्र

- Advertisement -

सौम्या असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने तिच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिने 20 दिवसांपासून महावीर नगर फर्स्ट येथील पीजीमध्ये भाड्याने राहायला आली होती. सौम्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीने शेवटचे पाहिले होते. सौम्या ही लखनऊची रहिवासी असून तिने रात्री आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सौम्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. यानंतर तिचे कुटुंबीय लखनऊ येथून कोटा येथे पोहोचले. सोम्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांची अस्वस्थ आहेत. त्यांनी पोलिसांनी सांगितले की, सौम्या अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिने आत्महत्या का केली, हे समजण्यापलीकडचे आहे. सोम्याच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही. परंतु विद्यार्थीनी ज्या खोलीत होती तिथे अँटी हँगिंग यंत्र बसवलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Liquor Policy Scam : अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ; 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात

आत्महत्येची वर्षभरातील सातवी घटना

कोटामध्ये कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांबाबत केंद्र सरकारकडून एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. मुलांना नैराश्यमुक्त ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहेत. सन 2023 मध्येही 12 हून अधिक कोचिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्यानंतर मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, शासन आणि कोचिंग संस्थांतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. मात्र कोचिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना थांबताना दिसत नाहीत. 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत कोचिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही सातवी घटना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -