घरठाणेखासदार विचारे यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला होता-नरेश म्हस्के

खासदार विचारे यांनीही काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला होता-नरेश म्हस्के

Subscribe

भास्कर पाटील शिंदे गटातच

ठाणे । माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कोकणचे असल्याने सगळ्याच कोकणवासियांनी त्यांच्या मागे जाण्याचा विचार केला होता. त्यात खासदार राजन विचारे देखील होते, परंतु मला जाण्याची इच्छा नसतांनाही केवळ माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा वापर करुन उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्याचे कटकारस्थान करण्याचे काम याच मंडळींनी केले होते, असा उलट आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

याचदरम्यान त्यांनी महापालिका निवडणुका लावण्याच्या वेळेस सत्तेत कोण होते, उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही लावल्या त्यावेळेस निवडणुका? असा सवाल उपस्थित करीत त्याचे खापर आमच्यावर फोडू नका असे म्हणत त्यांनी ते खापर ठाकरे गटावर फोडले. यावेळी म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत भास्कर पाटील यांना आणून ते शिंदे गटात असल्याचे दाखवून दिले. पाटील यांची ठाणे शहर विधानसभा क्षेत्रच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचे पत्रही त्यांना याप्रसंगी देण्यात आले.

- Advertisement -

भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्याला चोवीस तास होत नाही तोच मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊनच पत्रकार परिषदेत दाखल होत. ते शिंदे गटातच असल्याचे दाखवून दिले. यावेळी म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीका करताना ते ही राणे यांच्या मागे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते असा आरोप केला. मला मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचा एबी फॉर्म आला होता, विधान परिषदेचे देखील तिकीट मला मिळत होते. मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे.

त्यामुळे पक्षनिष्ठा आणि शिवसेना काय असते हे तुम्ही सांगू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विचारे यांची निष्ठा ही केवळ त्यांच्या प्रभागापुर्तीच वेळोवेळी दिसून आली आहे. केवळ प्रभागपुर्ते विचार करीत असल्याने आणि वारंवार पक्षविरोधी कारवाया करीत असल्यानेच स्वर्गीय दिघे यांनी त्यांना बाजूला सारले होते असा आरोपही म्हस्के यांनी केला. मात्र आम्ही स्वत: तुम्हाला त्यातून बाहेर काढले आज जे काही तुम्ही आहात, ते केवळ एकनाथ शिंदेमुळेच आहात हे तुम्ही कसे विसरलात असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान भास्कर पाटील यांनी आपण पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही, किंवा कोणत्याही जुन्या केसस बाहेर काढण्याची धमकी दिलेली नाही. त्यामुळे माझा भाऊ किंवा इतर मंडळी जे सांगत आहे, ते चुकीचे असून त्याला कोणताही आधार नसल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले. आपल्याला पद कसे दिले गेले याबाबत मीच अनभिज्ञ असल्याचा दावाही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -