घरताज्या घडामोडीMPSC पूर्वपरीक्षेची हॉल तिकिटे सोशल मीडियावर, विद्यार्थ्यांचा डेटा लीक?

MPSC पूर्वपरीक्षेची हॉल तिकिटे सोशल मीडियावर, विद्यार्थ्यांचा डेटा लीक?

Subscribe

MPSCच्या पूर्वपरीक्षेचे हॉल तिकिटे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. टेलिग्राम या अॅपवर लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती आणि त्यांच्या हॉल तिकिटच्या डेटा लिक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लीक झाली असून प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

टेलिग्राम चॅनलवर १ लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा असून आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर करण्यात आला आहे. या माहितीमध्ये ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रं, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आणि अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, असा दावा या चॅनलवर करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आयोगाने यावर खुलासा केला आहे.

- Advertisement -

आयोगामार्फत एक टवीट करण्यात आले असून जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

येत्या ३० एप्रिलला MPSCची सुंयुक्त परीक्षा होणार आहे. परंतु या व्हायरल झालेल्या माहितीनंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. नवी मुंबई सायबर सेल गुन्हा दाखल करून तपास करणार आहे. मात्र, अशा पद्धतीने माहिती लीक होणे हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार असून संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.


हेही वाचा : ठाण्यात ५०० भटक्या श्वानांचे लसीकरण, मनसे आणि पॉज संस्थेचा अनोखा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -