घर ताज्या घडामोडी गुडन्यूज! बेस्टच्या ताफ्यात आणखी ६० प्रीमियम बस दाखल

गुडन्यूज! बेस्टच्या ताफ्यात आणखी ६० प्रीमियम बस दाखल

Subscribe

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नेहमीच बेस्ट उपक्रमाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. स्वस्त दरात प्रवास करायचा असल्यास प्रवाशांची नेहमीच बेस्ट बसला पसंती असते. त्यामुळे प्रवाशांचा मिळणार हा प्रतिसाद लक्षात घेता हेस्टने आणखी बस उपक्रमाच्या त्याफ्यात दाखल केल्या आहेत.

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नेहमीच बेस्ट उपक्रमाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतात. स्वस्त दरात प्रवास करायचा असल्यास प्रवाशांची नेहमीच बेस्ट बसला पसंती असते. त्यामुळे प्रवाशांचा मिळणार हा प्रतिसाद लक्षात घेता हेस्टने आणखी बस उपक्रमाच्या त्याफ्यात दाखल केल्या आहेत. त्यानुसार, बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३२ प्रीमियम बस असून आणखी ६० बस दाखल झाल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. (Mumbai 60 more premium buses in BEST service)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत बेस्टच्या ५० प्रीमियम बसगाड्या सहा मार्गांवर सुरू असून बुधवारपासून ठाणे ते अंधेरी (पूर्व) बसस्थानक आणि साकीनाका गुंदवली मेट्रो स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुलपर्यंत असे दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही बसमार्गांवर सकाळी ७.३० ते ११.३० आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंतच्या गर्दीच्या वेळेमध्ये १५ मिनिटांच्या अंतराने या बसगाड्या उपलब्ध असणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, विमानतळ मार्गावर धावणाऱ्या प्रीमियम बसला प्रवाशांची चांगलीच पसंती मिळत आहे. ही मागणी लक्षात घेता दक्षिण मुंबई ते विमानतळ आणि खारघर ते विमानतळ मार्गावर सध्याच्या ४५ मिनिटांऐवजी ३० मिनिटांच्या वारंवारितेने बस सेवा उपलब्ध असेल, असेही महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

‘चलो ॲप’वर आरक्षण आणि अचूक वेळ

- Advertisement -

प्रवाशांना प्रीमियम बस सेवेबाबत माहितीसह वेळापत्रकाची सुविधा ‘चलो ॲप’वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येईल. ही बस सेवा १०० टक्के डिजिटल असून यामध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास बंदी आहे. बस सेवेचे तिकीट खरेदी केल्यानंतर त्याचे आसन आरक्षित करण्यात येते. आरामदायी आसनासह मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्याची सुविधाही बसमध्ये असल्याचे चंद्र यांनी सांगितले.


हेही वाचा – भाजप मुस्लिमांना काहीच देत नाही, हे माझे मत तुम्ही…. पद्मश्री विजेते रशीद कादरींनी थेट पंतप्रधान मोदींना सांगितले

- Advertisment -