घरताज्या घडामोडीमोहित कंबोज यांच्या घरी पोलीस दाखल, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जल्लोषात दाखवली तलवार

मोहित कंबोज यांच्या घरी पोलीस दाखल, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जल्लोषात दाखवली तलवार

Subscribe

भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष केला. भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या घराबाहेर जमले तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मोहित कंबोज यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला. जल्लोषात मोहित कंबोज यांनी म्यानातून तलवार काढून दाखवली असल्यामुळे मोहित कंबोज यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराबाहेर मुंबई पोलिस दाखल झाले आहेत. मोहित कंबोज यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणामध्ये राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर मोहित कंबोज यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. कंबोज यांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच फटाके फोडण्यात आले. जल्लोष सुरु असताना मोहित कंबोज यांनी तलवार काढून हवेत भिरकावली आहे. यामुळे पोलिसांचे पथक मोहित कंबोज यांच्या घराबाहेर दाखल झाले आहेत.

- Advertisement -

मुंबई बॉम्ब ब्लास्टमधील आरोपींविरोधात नवाब मलिकांचे संबंध होते आणि आहेत. त्यांनी देशाविरोधात कसे पैसे वापरले आणि त्यातून कोणती कारवाई करण्यात आली याबाबत पुढे माहिती समोर येईल. चौकशीमध्ये सगळं समोर येईल. देशविरोधात कारवाई करणारा व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिला ही देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अपमानाची बाब आहे.

अशा मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे असे मोहित कंबोज म्हणाले आहेत. नवाब मलिक यांचा १९९३ च्या स्फोटाशी, दाऊद इब्राहिमसोबत, हसीना पारकरसोबत काय संबंध आहेत याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारला येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला द्यावे लागेल असे मोहित कंबोज म्हणाले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर आपण भूमिका मांडणार असल्याची माहिती मोहित कंबोज यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Nawab Malik Arrested : नवाब मलिक पीएमएलए कोर्टात दाखल, ईडीकडून कोठडी मागण्याची शक्यता

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -