घरताज्या घडामोडीमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कार जळून खाक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कार जळून खाक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Subscribe

मृत्यू झालेल्या तिघांची नावे अद्याप कळू शकली नाहीत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. (Mumbai-Pune Expressway accident car caught fire Three persons died)  खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉलच्या दरम्यान असलेल्या तीव्र उताराजवळ असलेल्या वळणावर गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कंटेनरने मागून एका ट्रकला जोरदार धडक दिली त्यानंतर ट्रकने पुढे असलेल्या आयटेन कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कंटेनर कारला धडकताच कारने पेट घेतला. त्यामुळे अपघातात कारमध्ये असलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे कंटेनर चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघांची नावे अद्याप कळू शकली नाहीत. खोपोली पोलिसांकडून या अपघाताची चौकशी सुरु आहे.

गाडीने पेट घेतल्याने कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. यात आई, वडिल आणि मुलगा अशा तिघांचा समावेश होता. आगीत कार जळून खाक झाली आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बोरघाट महामार्ग सहाय्यक पोलीस निरिक्षक जगदीश परदेशी त्यांच्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. अग्निशन दलाच्या जवानांनी बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर IRBI कंपनीचे कामगार आणि क्रेनच्या मदतीने अपघात झालेली तिन्ही वाहने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर काही वेळात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरिल वाहतूक सुरळीत झाली.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! लग्नाआधी सेक्स करणे पडले महागात, प्रेयसीचा मृत्यू तर प्रियकर गंभीर जखमी

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -