घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा आता क्रूझने प्रवास

मुंबई-गोवा आता क्रूझने प्रवास

Subscribe

मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी आता विमान, ट्रेन आणि रस्त्याशिवाय जलमार्गाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर भारतातील सर्वात पहिली प्रवासी क्रूझ सेवा सुरू करण्यात आली असून, बुधवारी त्याचे उद्घाटन झाले. चाचणीसाठी आंग्रिया हे क्रूझ मुंबईच्या किनारपट्टीवर नव्याने उभारण्यात आलेल्या टर्मिनलहून गोव्याला रवाना झाले. गुरुवारी सकाळी क्रूझ गोव्याला पोहोचली.

किंमत ७ हजारापासून तिकिट
क्रूझने प्रवास करायचा असेल तर थोडा खिसा हलका करावा लागेल. या क्रूजजच्या तिकिटाचा दर ७ हजार रुपयांपासून चालू होतो. यामध्ये दोनवेळचे जेवन आणि नाश्ता मिळणार आहे. शिवाय, गोव्याच्या किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. तसंच स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहण्याचा आनंदही घेऊ शकता. क्रूझमधील कर्मचारी तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असतील. तसंच परिसराचं ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला सांगतील. ज्यांना सोयीसुविधांसोबत प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांनाच हा प्रवास परवडणारा असून, कंपनीदेखील अशाच प्रवाशांचा शोध घेणार आहे.

- Advertisement -

रेल्वे आणि बस सुविधांना लागणारा खर्च
मुंबई ते गोवा वॉल्वो बसने प्रवास करायचा म्हटला तर १००० ते २५०० रुपये तिकीट त्यातही तेजसने तर तिकीट २६०० रुपये आहे. क्रूझने प्रवास करताना आहे. विमानाने प्रवास करायचा असेल तर ३५०० ते ७००० रुपये खर्च करावे लागतात.

क्रूझमधील रेस्टॉरंट्स
या क्रूझमध्ये आठ वेगवेगळे रेस्टॉरंट्स असणार आहेत. सोबतच कॉफी शॉप, रिक्रिएशन रुम, लाँज आणि स्विमिंग पूल असणार आहे. एकावेळी क्रूझमध्ये ३५० प्रवासी प्रवास करू शकतात.

- Advertisement -

वेळ काय असेल?
सध्या क्रूझ सेवा सुरू झाली नसली तरी चाचणी केली जात आहे. मुंबईतून संध्याकाळी ५ वाजता क्रूझ रवाना होईल, जी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहोचेल. मुंबईसाठी क्रूझ सेवा एक दिवसाच्या अंतराने सुरू असेल.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -