मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २४ तासांसाठी ‘या’ भागात पाणीकपात

Water supply cut

मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्यामार्फत पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागातील गोरेगाव, विलेपार्ले,घाटकोपर, कुर्ला, भांडुप, मरोळ- मरोशी, असल्फा, सांताक्रूझ, खार या भागात काही ठिकाणी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, गोरेगाव, बिंबीसार नगर, धारावी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी सदर काम सुरू होण्यापूर्वीच आवश्यक पाणी भरून व त्याचा साठा करून काळजीपूर्वक पाणी वापरावे. पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे. मात्र ठरलेल्या कालावधीत अथवा त्यापूर्वी काम झाल्यानंतर खंडित पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर X १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

पूर्व उपनगरातील खालील भागात पाणी बंद

घाटकोपर भागात हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, असल्फा, साकीनाका, जंगलेश्वर महादेव मंदीर, राम नगर, गणेश मैदान, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमनगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, गंगावाडी, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी आदी भाग.

भांडुप भागातील, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई आदी भाग

पश्चिम उपनगरात खालील भागात पाणी बंद

– के/पूर्व विभागातील बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा ,पास्कल कॉलनी, पारसी कॉलनी,गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर, नेहरू मार्ग, चकाला गावठाण, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्लेचा बहुतांश भाग, मजासगाव टेकडी, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर, पी ऍन्ड टी कॉलनी, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, मरोळ-मरोशी मार्ग आदी भाग

  • पी/दक्षिण विभागातील, राम मंदीर, गोरेगाव (पश्चिम )

– एच/पूर्व विभागातील, हनुमान टेकडी, ७ वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईप लाईन मार्ग, नेहरु मार्ग सांताक्रुझ (पश्चिम), गजधरबंध, खार पश्चिमचा पश्चिम रेल्वे व डॉ. आंबेडकर मार्गमधील काही परिसर

खालील भागात होणार कमी दाबाने/ खंडित पाणी

– पी/दक्षिण विभागातील, गोरेगाव, बिंबीसार नगर

– के/पूर्व विभागातील, मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, उपाध्याय नगर, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, चर्च मार्ग, कदम वाडी, भंडारवाडा, सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील भागात २९ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने राहील / खंडित राहील.

– एच/पश्चिम विभागातील, वांद्रे (पश्चिम) भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.


हेही वाचा : माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपाकडून कोटींचा खर्च, राहुल गांधींचा हल्लाबोल