घरताज्या घडामोडीमाझ्या जीवाला पवारांच्या कुटुंबापासून धोका, सदाभाऊंनी आरोप करताच गृहमंत्र्यांनी सुरक्षा वाढवली

माझ्या जीवाला पवारांच्या कुटुंबापासून धोका, सदाभाऊंनी आरोप करताच गृहमंत्र्यांनी सुरक्षा वाढवली

Subscribe

सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होत्या.

टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीच्या नेत्यापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होत्या. (My life is in danger from Pawar’s family, extend security force of sadabhau khot)

हेही वाचा सदाभाऊ खोतांच्या गाडीचा ताफा अडवणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

- Advertisement -

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

दरम्यान, सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेलचालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. हॉटेलचे बिल भरले नसल्याचा आरोप करत हॉटेल चालकाने त्यांना अडवून ठेवलं होतं. मात्र, हे आरोप खोटे असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीचा नेता यामागे होता. तसंच राष्ट्रवादी पक्षापासून विशेषत: पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोपही त्यांनी केला होता.

हेही वाचा – वाघाला दगड मारला तर तो नरडीचा घोट घेतो, सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

तसेच, हा सर्व प्रकार झाला त्यानंतर मी याचा शोध घेतला तर अशोक शिंगारे हा गुन्हेगार आहे असे कळाले. २०२० मध्ये कर्नाटकात सोने चोरीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात दाखल आहे. या व्यक्तिविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तो वाळू माफिया आहे, तो दारू विक्रेता आहे. यानंतर आम्ही याचा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेतला. त्या व्यक्तीच्या फोनवर कुणाचे फोन आले, त्याला अटक केल्यावर पोलिसांना कुणी फोन केले त्याचे रेकॉर्ड काढणे गरजेचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -