घरमहाराष्ट्र'माय महानगर'च्या टॅगलाईन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद; 'हे' आहेत विजेते!

‘माय महानगर’च्या टॅगलाईन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद; ‘हे’ आहेत विजेते!

Subscribe

सत्य आणि आतली बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या निर्धाराशी कायमच बांधील राहिलेल्या ‘माय महानगर’ वेबसाईटला १९ जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्ताने ‘माय महानगर’च्या वाचकांसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला अपेक्षेपेक्षाही प्रचंड असा प्रतिसाद माय महानगरच्या वाचकांनी दिला यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार. वाचकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपली उत्तरं आम्हाला पाठवली. त्यांच्यामधून ३ विजयी स्पर्धक निवडणं आमच्या निवड समितीसाठी एक कठीण काम होतं. खरंतर आमच्यापर्यंत आलेली सर्वच उत्तरं ही विजयी ठरण्यासाठी निश्चितच पात्र होती. मात्र, स्पर्धेच्या नियमांप्रमाणे आम्हाला त्या सर्व उत्तरांमधून ३ विजयी स्पर्धकांची निवडणं आवश्यक आणि बंधनकारक होतं. त्यामुळे अखेर आमच्या निवड समितीने त्यातून ३ विजयी स्पर्धकांची नावं निश्चित केली आहेत.

काय होती स्पर्धा?

‘माय महानगर’ने गेल्या वर्षभरात आपल्या वाचकांसाठी निर्भिडपणे सत्य मांडणारी बातमीदारी केली. या प्रवासामध्ये मोठ्या संख्येनं वाचक ‘माय महानगर’सोबत जोडले गेले. त्यांचा या काळातला अनुभव कसा होता? या आधारावर एक टॅगलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘माय महानगर म्हणजे…………’ अशी अपूर्ण टॅगलाईन देण्यात आली होती. आणि वाचकांनी त्यांच्या आवडीनुसार ही टॅगलाईन पूर्ण करायची होती. यासाठी १९ जून ही शेवटची तारीख होती. वाचकांनी पाठवलेल्या उत्तम टॅगलाईनपैकी आमच्या निवड समितीने निवडलेल्या ३ सर्वोत्तम टॅगलाईन आणि त्या पाठवणाऱ्या विजयी उमेदवारांची नावं पुढीलप्रमाणे:

- Advertisement -

प्रशांत गायकवाड – मुंबई
टॅगलाईन : ‘माय महानगर’ म्हणजे चौथ्या स्तंभाची विश्वासार्हता!

मोहम्मद शेख – नाशिक
टॅगलाईन : ‘माय महानगर’ म्हणजे सत्यता!

- Advertisement -

रामेश्वर जाधव – औरंगाबाद
टॅगलाईन – ‘माय महानगर’ म्हणजे सोप्या भाषेत बातमी!

या तिनही विजयी स्पर्धकांचं संपूर्ण ‘महानगर’ परिवाराकडून अभिनंदन! विजयी स्पर्धकांनी येत्या मंगळवारी अर्थात २ जुलै, २०१९ रोजी दुपारी १२ वाजता आमच्या माहीम येथील कार्यालयात बक्षिस घेण्यासाठी उपस्थित राहावे. तुम्ही ‘माय महानगर’वर दाखवलेला विश्वास, आपुलकी आणि प्रेमाच्या कसोटीवर पूर्णपणे उतरण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत राहू हा आमचा वाचकांना शब्द आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -