घरमहाराष्ट्रधक्कादायक नागपूरात तरुणाने 'या' कारणामुळे केली आत्महत्या

धक्कादायक नागपूरात तरुणाने ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या

Subscribe

नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपूरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याची आत्मा बोलवते असे सुसाइट नोटमध्ये लिहून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षिय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने आत्महत्येचे दिलेले कारण ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. सौरभ नागपूरकर असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून गेल्या काही दिवसापासून तो मानसिक तणावात होता. अपघातामध्ये मृत्यू झालेला चिमुकला मला बोलावत असल्याचे त्याने या सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे.

अपघाती मृत्यू झालेला चिमुकला बोलावतोय

सौरभ नागपूरकरने दोन महिन्यापूर्वी एका लहान मुलाचा अपघात होताना पाहिले होते. या अपघातामध्ये या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. हा अपघात सतत माझ्या डोळ्यासमोर येतो. अपघातात मृत्यू झालेला चिमुकला मला बोलावतोय तसंच त्याचा आत्मा मला त्याच्याजवळ येण्यास सांगत आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्याने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे. तसंच सौरभच्या गाडीला दोनवेळा अपघात झाला होता हे अपघात या चिमुकल्यामुळेच झाले होते. तो सतत रस्त्यामध्ये येत असल्याचे देखील सौरभने या नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गळफास लावून केली आत्महत्या

सौरभ नागपूरमधील कसाबपूरा भागामध्ये राहत होता. तसंच तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता आणि अभ्यासातही खूप हुशार होता. मात्र गेल्या महिन्यापासून तो तणावात होता. कोणाशीच काही बोलायचा नाही. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. मी घाबरलो असल्याचे तो वारंवार सगळ्यांना सांगायचा. मात्र याकडे कोणीच लक्ष दिले नाही. सौरभने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्ये केली. त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -