घरताज्या घडामोडीभाजपच्या कटकारस्थानाविरोधात आमच्याकडेही मसाला तयार, नाना पटोलेंचा ईडी कारवाईवरुन इशारा

भाजपच्या कटकारस्थानाविरोधात आमच्याकडेही मसाला तयार, नाना पटोलेंचा ईडी कारवाईवरुन इशारा

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राविरोधी आणि समाजाविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करतंय अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. भाजपच्या कटकारस्थानाविरोधात आमच्याकडेही मसाला तयार करण्यात आला आहे. आम्हीसुद्धा दणका देणार असा स्पष्ट इशारा नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वकील सतीश उके यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. सौ सोनार की, एक लोहार की, आमच्याकडेसुद्धा मसाला तयार आहे. आम्ही दणका देणार आहे. भाजपच्या कटकारस्थानाविरोधात लवकरच मोहिम आखणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कारवाईविरोधात उद्रेक होणार

ईडीची कारवाई ही अघोषित आणीबाणी असून त्याच्याविरोधात उद्रेक होणं निश्चित आहे. भाजप देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतंय. मोदींविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात रणनिती आखणार आहे. लोकशाहीमध्ये जनता मोठी असते. हे भाजपला कळायला हवं यामुळे आता जनताच भाजपला धडा शिकवेल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

देश वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू

मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मोदी आणि भाजपला राष्ट्रवादीच पर्याय

राष्ट्रीय पातळीवर यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आहे. भाजपला आणि मोदींना काँग्रेसच पर्याय आहे. यामुळे यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेसच ठरवेल. आताची वेळ भाजपविरोधात लढायची आहे. कोण अध्यक्ष होणार किंवा नाही याची वेळ नाही असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी, अन्यथा उद्यापासून कठोर कारवाई होणार, अजित पवारांचा पुन्हा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -