घरताज्या घडामोडीSushant Sucide Case: सुशांतसिंहची आत्महत्या नव्हे तर हत्या - नारायण राणे

Sushant Sucide Case: सुशांतसिंहची आत्महत्या नव्हे तर हत्या – नारायण राणे

Subscribe

सध्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘याबाबत राज्य सरकारची जी काही चौकशी सुरू आहे. हे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतसिंहची आत्महत्या नव्हे, त्याची हत्या झाली आहे. पण याबाबत अद्याप मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. बिहारमध्ये झाला पण महाराष्ट्रात झाला नाही. गुन्हेगारांना वाचवायचं आणि भ्रष्टाचार करायचा, एवढंच काम सरकारला येत.’

आणखी काय म्हणाले नारायण राणे?

नारायण राणे म्हणाले की, ‘सुशांतसिंह आत्महत्येच्या प्रकरणाला ५० दिवस झाले तरी मुंबई पोलिस ८ जून आणि १३ जूनच्या पार्टीला जे कोणी उपस्थितीत होते त्यांना का अटक करत नाही? याची कारणे काय आहेत? त्या हॉस्पिटलमध्ये नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि म्हणतो मी लटकताना पाहिला? पडल्यानंतर दोन तासांनी येणारा माणूस कसं काय सांगू शकतो की, मी लटकताना पाहिला तिथे? तो ठराविक रुग्णवाहिका का बोलावतो? ठराविक रुग्णालयातच का नेतो? सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत. का गोष्टी लपवल्या जात आहे?’

- Advertisement -

पुढे नारायण राणे म्हणाले की, ‘सुशांतच्या घराजवळ ४ मिनिटांवर डिनो मोरीयाचा बंगाल आहे. त्यांच्या घरी दररोज काही मंत्री येतात हा कोण आहे? काय करतात ते मंत्री तीन ते चार तास तिथे थांबून? आणि त्याच्या बंगल्यावरूनच १३ तारिखेला सुशांतच्या घरी सगळे गेले. जमले कुठे मोरीयाच्या घरी आणि गेले कुठे सुशांतच्या घरी? आता या सगळ्यांमध्ये मंत्री असेल तर कुठल्या कॅमेरामध्ये त्यांच्या गाड्याच्या ताफा येणार नाही का? नाव का लपवतायत? कोण आहे ते सगळ्यांना माहित आहे? याअर्थी सर्व दबाव सरकावर येतोय, पोलीस अधिकाऱ्यांवर येतोय. अधिकारी वाचवायचा प्रयत्न करतात, पण ही लोकशाही आहे. त्यांना मी सांगतो हे नको ते करू नका. हे शक्य नाही आहे. विरोधी पक्ष आहे तो लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. तो अशा गोष्टी पचू देणार नाही. सगळ्यांना माहिती आहे, गाड्या कोणत्या होत्या?, किती होत्या?’

‘दरम्यान ८ तारखेला दिशा सालियान हिची देखील आत्महत्या झाली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं होत. तिनं ८ तारखेला आत्महत्या केली आणि तिचं ११ तारखेला पोस्टमॉर्डम झालं. या प्रकरणाबाबत पोलिसांनी अधिक माहिती का तपासली नाही? कारण ती सुशांतसोबत राहत होती. तिच्या पोस्टमॉर्डममधून समोर आलं आहे की, तिची ही आत्महत्या नसून हत्या झाली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला मारलं गेलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा असल्याचं देखील समोर आलं आहे. पण याबाबत पोलीस का गप्प बसले? अजून काय पुरावे पाहिजे?’, असं नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -