घरताज्या घडामोडीनारायण राणे म्हणतात, 'मुख्यमंत्र्यांचा अभ्यास नाही'!

नारायण राणे म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांचा अभ्यास नाही’!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आटोपल्यानंतर अलिकडेच भाजपवासी झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कणकवलीतील बडं प्रस्थ नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन खूप मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, त्यात काहीही नसून केवळ कोणत्याही अभ्यासाशिवाय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या. नाणारविषयी तर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत’, असं नारायण राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याविषयी खास नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

तीन मंत्र्यांची कॅबिनेट?

दरम्यान, यावेळी बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या मिनी कॅबिनेटविषयीच्या वक्तव्यावर टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी आम्ही खूप ऐकलं होतं की या दौऱ्यादरम्यान मिनी कॅबिनेट होईल. पण आले मोजून २ मंत्री. त्यांच्यासोबत एक मुख्यमंत्री अशा एकूण तीन मंत्र्यांची कॅबिनेट झाली का? मुख्यमंत्री फक्त हेलिकॉप्टरमधून आले आणि गेले. कोकणातल्या कोणत्याही योजनेला मुख्यमंत्र्यांनी निधी दिलेला नाही’, असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

विकासकामं स्थगित, मग योजना कधी होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील अनेक विकासकामं स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यावर देखील राणेंनी निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंचं कोकणाच्या विकासासाठी कोणतंही योगदान नाही. मुख्यंमत्री झाल्यानंतर त्यांनी विकासकामांना स्थगिती दिली. पण अजूनही त्या स्थगिती उठवल्या नाहीत. ३१ मार्चपर्यंत सगळी विकासकामं बंद करण्याचं नोव्हेंबरमध्ये सर्क्युलर काढलं. म्हणजे पीडब्ल्यूडीचा एकही पैसा खर्च होणार नाही’, असं राणे म्हणाले. शिवाय, ‘मच्छिमारांना कर्जमाफी विचाराधीन म्हणतात. पण नक्की कधी होणार? मच्छिमारांची उपासमार होत आहे. पण त्याबद्दल फक्त विचाराधीन बोललं जातं’, असं देखील राणेंनी नमूद केलं.


हेही वाचा – शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो-नारायण राणे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -