घरमहाराष्ट्रनारायण राणेंची 'जन आशीर्वाद यात्रा' उद्या सिंधुदुर्गात होणार दाखल

नारायण राणेंची ‘जन आशीर्वाद यात्रा’ उद्या सिंधुदुर्गात होणार दाखल

Subscribe

केंद्रीय उद्योग मंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा उद्या म्हणजेच शुक्रवारपासून रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहिल. शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नारायण राणे रत्नागिरीत यात्रा करून त्यानंतर त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवस यात्रा करून जन आशीर्वाद यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती यात्रा संयोजक प्रमोद जठार यांनी दिली .

- Advertisement -

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा सुरु होणार आहे. रत्नागिरीतून ही यात्रा सुरु होऊन संध्याकाळी सिंधुदुर्गमध्ये दाखल होणार आहे. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर प्रथमच कणकवलीत राणे यांचे आगमन होत आहे. उद्योग मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी कणकवली सज्ज असून जगोजागी गुढया उभारत,आकाशकंदील व रंगीबेरंगी विद्युत दिव्य्याची रोषणाई तसेच स्वागत पोस्टर्सनी संपूर्ण कणकवली सजली आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली शहर भाजपाने जनआशीर्वाद यात्रा व मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे. दोन दिवस सिंधुदुर्गमध्ये ही जनआशीर्वाद यात्रा चालणार असून कणकवलीतील पटवर्धन चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणे स्वागत स्विकारणार असून जनतेशी संवाद साधणार आहेत.

कणकवली पोलिसांनी बजावल्या नोटीसा

जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी कणकवली पोलिसांच्या पथकाने भाजप कार्यालयात दाखल होत कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी १४९ ची नोटीस भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बजावण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे पोलिसांनी भाजप कार्यालयात दाखल होत कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. तर जिल्ह्यात गेले काही दिवस सुरु असलेला राजकीय संघर्ष व आगामी काळातील सण, उत्सव या पार्श्वभूमीFवर जिल्ह्यात शांतता व भयमुक्त वातावरण कायम रहावे यासाठी दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलीस पथक यांच्यासह सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून संचलन करण्यात आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -