घरताज्या घडामोडीChipi Airport : चिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले ? राणेंनी केला...

Chipi Airport : चिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले ? राणेंनी केला खुलासा

Subscribe

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या श्रेयावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला होता. नारायण राणे यांनी कार्यक्रमाआधीच पत्रकार परिषद घेऊन भांडाफोड करण्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कानामध्ये काहीतरी बोलले, मी लक्ष दिले नाही, असे स्पष्टीकरण राणेंनी त्यावेळी दिले होते. पण आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्री नेमके काय बोलले याचा उलगडा आज केला. नारायण राणे आपल्या भाषणात आक्रमक झाल्याचेही पहायला मिळाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही नारायण राणेंच्या भाषणाचा समाचार घेतला होता. त्याच प्रकरणातील संवादाचा खुलासा राणेंनी आज केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री पदाला कलंक असल्याचे वक्तव्य केले आहे.

चिपीच्या श्रेयावर बोलताना नारायण राणेंनी एक पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या स्थानिक खासदारांवर राणेंनी टीका केली होती. चिपीचे श्रेय घेणारी काही चिल्लर बाजारात फिरते आहे, अशी टीका नारायण राणे यांनी स्थानिक खासदार विनायक राऊत यांच्यावर केली होती. त्याच पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेनेची भांडाफोड करण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नारायण राणे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. नारायण राणे यांनी या कार्यक्रमात बाळासाहेबांनी सिंधुदुर्गची जबाबदारी दिल्यानंतर याठिकाणी कसा विकास साधला याचा पाढा वाचून दाखवला खरा, पण त्यासोबतच महाविकास आगाडी सरकारने एअरपोर्ट, रस्ते आणि पर्यटनाच्या अनुषंगाने काय सुविधा द्याव्यात याबाबतही त्यांनी सूचना केल्या. याच कार्यक्रमात नारायण राणे आक्रमक होताना दिसले होते. व्यासपिठावरूनच त्यांनी तुम्ही आमच्या भागात आहात, काही वेडवाकड कराल, बोलाल, अशा पद्धतीचा सूचक इशारा दिला होता. पण या भाषणानंतरच मुख्यमंत्र्यांनीही नारायण राणेंच्या भाषणावर प्रत्युत्तर दिले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री राणेंच्या कानात काय बोलले ?

चिपीच्या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नारायण राणे यांच्या कानात बोलताना सर्वांनीच पाहिले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे नेमक काय बोलले हे मला लक्षात आले नाही. त्यामुळे मी पुन्हा त्यांना विचारले की तुम्ही नेमक काय बोललात ? त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भांडी आणलीत की नाही ? भांडाफोड करणार आहात ना ? या वक्तव्यानंतर मी चिडलो. मनात ठरवलच की आता भांडाफोड करायचीच. माझ्या भाषणातून मला जे बोलायच होते ते मी बोललोच. कार्यक्रमात मी चिडण्याचे कारणच मुख्यमंत्र्यांनी डिवचल्याचे कारण असल्याचे राणेंनी स्पष्ट केले.


Chipi Airport : बाळासाहेबांनी खोट बोलणाऱ्यांना थारा दिला नाही – नारायण राणे

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -