घरताज्या घडामोडीभाजपने आमच्याशी कुस्ती खेळून बघावी!

भाजपने आमच्याशी कुस्ती खेळून बघावी!

Subscribe

काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेचा घात केला असून ’मातोश्री’ची शक्ती क्षीण केल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला असता त्याला सेनेचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने ३० वर्षे शिवसेनेच्या याच शक्तीचा वापर करुन सत्ता उपभोगली. त्यामुळे ‘मातोश्री’विषयी बोलण्याचा त्यांना आता अधिकार राहिलेला नाही. आमच्याशी एकदा कुस्ती लावून बघा, मग सेनेची शक्ती समजेल. आम्ही भाजपच्या बंडखोरांसमोर कुस्ती खेळूनच निवडून आलो आहोत, असे सांगत त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर पलटवार केला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.30) नाशिकमध्ये विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी जळगावचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील उपस्थित. यावेळी पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी काय बोलले, हे मला माहित नाही. हा पक्षांतर्गत विषय असल्यामुळे त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही. कोणि गळा दाबला आणि कोणी गळा सोडला हे मला माहित नाही, असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

साधूमानसाच्या मनात काय?

- Advertisement -

भाजपने सेनेला पुन्हा निमंत्रण दिले आहे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला असता, ‘बॉस इस ऑलवेस राईट’ असे म्हणत त्यांनी समर्थन केले. नेत्याचा आदेश मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतल्यास आम्ही आदेशाचे पालन करु! उध्दव ठाकरे यांच्या मनात काय चालले आहे, याविषयी काही बोलणार नाही. साधू माणसाच्या मनात काय चालते? याविषयी आपण काय सांगणार असेही पाटील म्हणाले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -