घरमहाराष्ट्रनाशिकआठवडाभरात तब्बल १ लाख १६ हजार क्विंटल कांद्याची आवक

आठवडाभरात तब्बल १ लाख १६ हजार क्विंटल कांद्याची आवक

Subscribe

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे बाजारभाव पोहोचले पंधराशेवर

गेल्या आठवड्यात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची 1 लाख 16 हजार 205 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 600, कमाल रुपये 2,021 तर सर्वसाधारण रुपये 1,576 प्रतिक्विंटल राहीले.

लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रतीक्विंटल बाजारभाव असे होते… गहू (1,192 क्विंटल) भाव 1,491 ते 2,280, सरासरी 1,762 रुपये, बाजरी हायब्रीड (402 क्विंटल) भाव 1,200 ते 1,452, सरासरी 1,304 रुपये, हरभरा लोकल (186 क्विंटल) भाव 3,400 ते 6,002, सरासरी 5,111 रुपये, हरभरा काबुली (96 क्विंटल) भाव 3,200 ते 5,380, सरासरी 5,213 रुपये, सोयाबीन (1,080 क्विंटल) भाव 3,000 ते 7,652, सरासरी 7,213 रुपये, उडीद (05 क्विंटल) भाव 2,000 ते 4,600, सरासरी 3,900 रुपये, तूर (21 क्विंटल) भाव 4,000 ते 5,681, सरासरी 5,256 रुपये, मका (3,520 क्विंटल) भाव 1,451 ते 1,676, सरासरी 1,599 रुपये प्रतीक्विंटल राहीले.

- Advertisement -

निफाड उपबाजार आवारावरील आवक अन् बाजारभाव

उन्हाळ कांदा (27,385 क्विंटल) भाव रुपये 501 ते 1,751, सरासरी रुपये 1,400, सोयाबीन (202 क्विंटल) 4,000 ते 7,501, सरासरी 7,351 रुपये, गहू (488 क्विंटल) 1,441 ते 1,952, सरासरी 1,781 रुपये, बाजरी (23 क्विंटल) 1,201 ते 1,560, सरासरी 1,450 रुपये, मका (1,586 क्विंटल) 1,496 ते 1,761, सरासरी 1,601 रुपये, हरभरा (19 क्विंटल) 4,400 ते 4,781, सरासरी 4,600 रूपये प्रतीक्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवार

उन्हाळ कांदा (73,664 क्विंटल) भाव रुपये 700 ते 2,040, सरासरी रुपये 1,500, गहू (362 क्विंटल) 1,251 ते 2,051 सरासरी 1,900 रुपये, मका (1,215 क्विंटल) 1,000 ते 1,656, सरासरी 1,566 रुपये, बाजरी (31 क्विंटल) 1,300 ते 1,488, सरासरी 1,362 रूपये, हरभरा (45 क्विंटल) 3,000 ते 6,100, सरासरी 4,887 रुपये, सोयाबीन (316) क्विंटल 4,000 ते 7,331, सरासरी 7,200 रुपये प्रतीक्विंटल राहीले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -