Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र १० हजार थकबाकीदारांची वीज तोडली

१० हजार थकबाकीदारांची वीज तोडली

७ लाख २९ हजार ग्राहकांकडे ८५५ कोटींची थकबाकी

Related Story

- Advertisement -

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्य, पाणीपुरवठा, पथदीप व इतर वर्गवारीच्या ७ लाख २९ हजार ग्राहकांकडे तब्बल ८५५ कोटी ४० लाखांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकी वसुली मोहीम हाती घेत थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यात अशा १० हजार २६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.

सातत्याने पाठपुरावा करूनही ग्राहक वेळेत वीजबिल भरत नाहीत. महावितरणने ग्राहकांना बिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्याय देऊनही थकबाकी वाढत असल्याने वीज कंपनीपुढे मोठा प्रश्न उभा राहीला आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरोधात कठोर पाऊले उचलत वसूली मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीजबिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ई-मेलवर रितसर नोटीस पाठवली जाते. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे. संबंधित ग्राहकांनी थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत केला जातो.

अशी आहे थकबाकी

वर्गवारी ग्राहक संख्या रक्कम
- Advertisement -

नाशिक मंडळ-घरगुती २ लाख ८१ हजार ६७ कोटी ३२ लाख,वाणिज्यि ३७ हजार १९ कोटी ५६ लाख,औद्योगिक २ हजार ८९० ६ कोटी ३६ लाख,पथदिवे २ हजार ७१७ १७० कोटी ४२ लाख, पाणीपुरवठा योजना १ हजार ३६ २० कोटी ७४ लाख.

मालेगाव मंडळ- घरगुती ७२ हजार ७०१ १३ कोटी २६ लाख,वाणिज्यिक ५ हजार १ कोटी ८० लाख ,औद्योगिक ७९६ ७६ ला,पथदिवे १ हजार १३७ ५८ कोटी २७ लाख,पाणीपुरवठा योजना ५३६ १४ कोटी ८२ लाख

- Advertisement -