घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरात दिवसभरात १५४९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक शहरात दिवसभरात १५४९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

रुग्णालयात अवघे १९२ रुग्ण घेताहेत उपचार

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.१२) १ हजार ५४९ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये १ हजार १८४ नाशिक शहर, २६७ नाशिक ग्रामीण, ४० मालेगाव आणि ५८ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी अवघे ३ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात १९२ तीव्र लक्षणे असलेले रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील ३७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, ११२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १६० रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख २२ हजार ८४३ रुग्ण बाधित आढळून आले. त्यापैकी ४ लाख ७ हजार ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात ८ हजार ७६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यास संशयित रुग्ण प्रतिसाद देत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. जिल्ह्यात बुधवारी तब्बल ६ हजार ३५४ संशयित रुग्णांनी कोरोना टेस्ट केली असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक शहर १ हजार ३५१, नाशिक ग्रामीण ४ हजार ८९३, मालेगावमधील ११० रुग्णांचा समावेश आहे.

पुन्हा सक्रिय रुग्णसंख्या वाढली

जिल्ह्यात दिवसेंदिवस सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६ हजार ७१३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये नाशिक शहर ५ हजार १५५, नाशिक ग्रामीण १ हजार १९७, मालेगाव ९५ आणि जिल्ह्याबाहेरील २६६ रुग्णांचा समावेश आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -