घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यात १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यात १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.१५) ४३ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये १६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मालेगावचे ९, नाशिक शहर ३, दिंडोरी ३ आणि सिन्नरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचारी असून, जुन्या नाशकातील ४२ वर्षीय पुरुष सातपूरमधील करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ७७४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

नाशिक जिल्हा प्रशासनास तीन टप्प्यात ४३ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यातील १० रिपोर्ट मालेगाव शहर, ९ मालेगाव ग्रामीण व १० नाशिक शहरातील आहेत. पहिल्या टप्प्यातील ३९ निगेटिव्ह रिपोर्ट व ४ पॉझिटिव्ह आले आहेत. दुसर्‍या टप्प्यात २९ अहवाल प्राप्त झाले. दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह व २७ रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह रुग्ण मालेगाव शहरातील आहेत. सायंकाळी तिसर्‍या टप्प्यात आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील नाशिकरोड व जुने नाशिक येथील रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

- Advertisement -

जुन्या नाशकात करोनाचा शिरकाव

नाशिक शहरातील भद्रकाली येथील नाईकवाडीपुरामध्ये करोनाचा शिरकाव झाला. ४२ वर्षीय पुरुषास करोनाची लागण झाली आहे. करोनाबाधित रुग्ण सातपूर येथील करोनाबाधित महिलेचा संपर्कात आलेला आहे. सदर महिला मालेगाव रिटर्न आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय दोन पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचारी आहेत. त्यांच्या संपर्कातील नागरिक व नातलगांचा शोध घेतला जात असून त्यांना क्वारंटाइन केले जाणार आहे.

- Advertisement -

नाशकात हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये ४४२ जण

नाशिक शहरातील ८१५ नागरिकांचे १४ दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. शुक्रवारी शहरात करोनाची लक्षणे आढळून आलेल्या ४६ नागरिकांना रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. महापालिकेच्या रुग्णांमध्ये सध्या १३६ नागरिक उपचार घेत आहेत. महापालिका रुग्णालयातील ३७,खासगी रुग्णालयातील ८ असे एकूण ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ४५ पैकी ३२ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण ३० प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या क्षेत्रांमध्ये ४४२ हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व ८५५ संपर्कातील संशयित रुग्ण आहेत.

दिंडोरीत तीन, सिन्नरमध्ये एक रुग्ण

नाशिक जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.१५) ९६ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये चार अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील एक, दिंडोरी तालुक्यातील इंदोरचे दोन व मोहाडीतील एका महिलेचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये इंदोर येथील 33 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, मोहाडी येथील 40 वर्षीय महिला व सिन्नर पांढुर्ली येथील 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

१६६ पोलीस करोनाबाधित

मालेगाव शहरात कर्तव्य बजावणार्‍या १६६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून ५० वर्षांवरील ६४ पोलीस कर्मचार्‍यांना विश्रांती देण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना कमी जोखमीच्या जबाबदार्‍यांमधूनही वगळून घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव कोव्हिड १९ रुग्णालयात ९५ करोना पॉझिटिव्ह पोलिसांवर उपचार सुरु आहेत.पोलिसांच्या २० नातेवाईकांवरही याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण – ७७४
मालेगाव-६००
मालेगाव ग्रामीण-१६
नाशिक शहर -४१
नाशिक ग्रामीण-९8
नाशिक ९, निफाड १३, येवला ३३, सिन्नर ७, दिंडोरी ९, चांदवड ४, कळवण १, नांदगाव ४,
अन्य ३०
मृत रुग्ण – ३३
बरे झालेले रुग्ण – ४५९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -