Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक अवैध दारूविक्री करणार्‍या १६५ जणांना अटक

अवैध दारूविक्री करणार्‍या १६५ जणांना अटक

Subscribe

उत्पादन शुल्क विभागाने १९२ गुन्हे दाखल केले असून १६५ जणांना अटक केली असून ४४ लाख ७६ हजार ८२३ रूपयांचा मुद्देमाल दारूबंदी गुन्ह्यात जप्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हाभर छापासत्र सुरू आहे. १० मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूकविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाने १९२ गुन्हे दाखल केले असून १६५ जणांना अटक केली असून ४४ लाख ७६ हजार ८२३ रूपयांचा मुद्देमाल दारूबंदी गुन्ह्यात जप्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, निवडणूका शांततेत पार पडाव्यात, यासाठी राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाकडून आदर्श आचारसंहितेचे पालन केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जिल्हाभर छापासत्र सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नाशिक विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी अवैध मद्य वाहतूक, विक्री, बनावट मद्यनिर्मितीवर कठोर कारवाई करत आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल

- Advertisement -

१ हजार ५९ लिटर गावठी हातभट्टी दारू, २२ हजार ४८५ लिटर रसायन, १०५ लिटर देशी दारू, १ हजार ९१५ विदेशी दारू, ४०५ लिटर ताडी, १ हजार ५ लिटर बीआर, १२३ लिटर परराज्यातील विदेशी मद्य जप्त केले. तसेच ११ चारचाकी वाहने व १ रिक्षा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -