घरताज्या घडामोडीशेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

Subscribe

शेततळ्यातील लिकेज काढत असताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या पुतण्याला वाचवताना पुतण्यासह चुलत्याचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१७) अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे घडली. पुतण्या कार्तिक सुनिल गोर्डे (१९), चुलता अनिल खंडु गोर्डे (४५) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील भिमा शंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात रविवारी दुपारी लिकेज काढण्याचे काम सुरु होते. शेततळ्याच्या कागदावरच्या शेवाळावरुन कार्तिक सुनिल गोर्डे पाय घसरून पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याला वाचवण्यासाठी चुलता अनिल गोर्डे यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला. याची माहिती मिळताच जवळच्या कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह शेततळ्याबाहेर काढले. ही बाब पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब भोसले, वलवे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल आणला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -