घरताज्या घडामोडीमालेगाव @ 226; तीन महिन्याच्या बाळाला कोरोना, 44 नवे पॉझिटिव्ह

मालेगाव @ 226; तीन महिन्याच्या बाळाला कोरोना, 44 नवे पॉझिटिव्ह

Subscribe

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरू असून, बुधवारी (दि.29) रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयास मालेगावातील  152 रिपोर्ट मिळाले आहेत. त्यातील 108 रिपोर्ट निगेटिव्ह व 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तीन महिन्याच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  मालेगावात आता 226 कोरोनाबाधित रुग्ण असून 12 जणांचा मृत्यू व सातजण बरे झाले आहेत. येवल्यात एक महिला कोरोनाबाधित झाली आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 249 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

मालेगावात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. ते नाशिकमध्ये असतानाच 56 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांत 12 पोलीस अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच येवल्यात आणखी एक महिला कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्टवरून समोर आले आहे. त्यामुळे येवल्यात एकाच कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित झाले आहे. नाशिक शहरात 10 कोरोनाबाधित असून दोनजण बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित असून दोनजण बरे झाले आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -