घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य गुरुवार, ३० एप्रिल २०२०

राशीभविष्य गुरुवार, ३० एप्रिल २०२०

Subscribe

मेष ः- सकाळचा उदासपणा लंचनंतर कमी होईल. धंद्यात खूशखबर मिळेल. नातलगांच्या मदतीला जावे लागेल.

वृषभ ः- सकाळी महत्त्वाचे काम करावे. दुपारनंतर प्रवासात अडचण येऊ शकते. धंद्यात खर्च वाढू शकतो.

- Advertisement -

मिथुन ः- मान-प्रतिष्ठा मिळेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमाच्या माणसांची भेट होईल. मित्र मदत करतील.

कर्क ः- तुमच्या मनावरील ताण कमी होईल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. उत्साह वाढेल.

- Advertisement -

सिंह ः- मुलांचे यश पाहण्याचे स्वप्न पहाल. दुपारनंतर तुमच्या मनावरील दडपण कमी होईल.

कन्या ः- दुपारनंतर कामात अडचणी येऊ शकतात. नम्रता ठेवा. प्रेमाने वागा. समस्या सोपी होईल.

तूळ ः- सकाळी झालेला वाद संध्याकाळी पूर्ण उजळेल. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. दुखापत टाळा.

वृश्चिक ः- मनावरील दडपण वाढणार नाही हे पहा. वादविवाद टाळता येईल. धंदा चालू ठेवा.

धनु ः- महत्त्वाच्या वेळी महत्त्वाचेच काम करावे. अपेक्षित व्यक्तीची भेट घडेल. आजचे काम आजच करा.

मकर ः- आप्तेष्ठांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल. नवे मित्र मिळतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रगती होईल.

कुंभ ः- व्यवसायात चांगला फायदा होईल. थकबाकी वसूल करा. कल्पना कृतीत उतरवता येईल.

मीन ः- तुमची समस्या सोडवण्याचा नवा मार्ग मिळेल. नवीन ओळख होईल. धंद्यात मोठे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -