घरमहाराष्ट्रनाशिकम्युकरमायकोसिसचे नाशकात ५६३ रुग्ण, ५४ बळी

म्युकरमायकोसिसचे नाशकात ५६३ रुग्ण, ५४ बळी

Subscribe

जिल्ह्यात एकूण ५६३ नवे रुग्ण आढळले, २३७ रुग्ण झाले बरे

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस झपाट्याने वाढत असल्याने, जिल्ह्यात एकूण ५६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २३७ रुग्ण बरे झाले असून, ५४ रुग्णांचा बळी गेला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्ग ओसरत असला तरी आता म्युकमायकोसिसने डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र प्रयत्न करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी जोखमीच्या शस्त्रक्रिया करुन १९० रुग्णांचे डोळे व नाकालगतचा भाग काढून टाकला आहे. जिल्ह्यात सध्या २७२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात नाशिक शहर १४२, जिल्हा रुग्णालय २०, मालेगाव १, एसएमबीटी रुग्णालय ६२ व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात ४३ रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -