घरमहाराष्ट्रनाशिकसटाण्यातील ऑईल मिलला भीषण आग

सटाण्यातील ऑईल मिलला भीषण आग

Subscribe

लाखो रुपयांचा माल जळून खाक, दोन कर्मचारी जखमी

सटाणा : सटाणा-देवळा रस्त्यावरील कंधाणे फाट्यावर असलेल्या स्वदेशी शेंगदाणा ऑईल मिलला बुधवारी (दि.१६) दुपारी शॉकसर्किटमुळे आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सटाणा नगरपरिषद वमालेगाव महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न केले जात होते. या आगीत मिलमधील दोन कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा शहरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या कंधाणे फाट्यावर भांगडीया कुटुंबीयांची स्वदेशी नावाची शेंगदाणा ऑईल मिल आहे. या मिलमध्ये कर्मचारी नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. त्यावेळी ११.२५ वाजता मिलच्या आतील गोडाऊनला आग लागल्याने धूर येत असल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले असता कर्मचार्‍यांनी तत्काळ मिलबाहेर पळ काढला. मात्र, काही कळण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन कर्मचारी जखमी झाल्याचे समजले आहे. मिलमध्ये मोठ्या प्रमाणात तेल काढण्यासाठी भुईमुगाच्या शेंगांचा साठा करून ठेवण्यात आला होता. त्याच ठिकाणी ही आग लागली. त्यामुळे साठा वाळलेल्या शेंगा, शेंगांचे टरफले व तेल यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिल कडे धाव घेतली परंतु मोठ्या प्रमाणावर असलेल्या धुरामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते.

- Advertisement -

दरम्यान ,या लागलेल्या आगीची माहिती मिळताच सटाणा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यापाठोपाठ तीन टँकर ही मदतीसाठी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते.मात्र आगीचे मोठ्या प्रमाणावर असलेले लोळ व भुईमूग शेंगांना लागलेली आग यामुळे धुराचे लोळ दुपार पर्यंत बाहेर येत होते.दुपारी दोन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मालेगाव येथील महापालिकेचा अग्निशमन बंबाला ही पाचारण करण्यात आले .आग पसरु नये म्हणून मिलच्या गोडाऊनचा पत्रा कापून जेसीबीच्या साह्याने आतील शेंगाचे पोते व टरफले बाहेर काढण्यात येउन त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारुन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते.

घटनास्थळावर सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल,साह्ययक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई आदी सह पालिकेचे कर्मचारी उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत होते. सध्या आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळु शकलेले नसून सटाणा व मालेगाव अग्निशमन बंबाकडुन विशेष प्रयत्न सुरू होते.

- Advertisement -

अग्निशमन यंत्रणाच नाही

सदर ऑइल मिल मध्ये कुठल्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा बसवलेली नसल्याने आग आटोक्यात येण्यास उशीर लागला.स्थानिक प्रशासणाने कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता हि मिल उभारण्याची परवानगी दिली तरी कशी असा प्रश्न समोर येत आहे. या आगीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -