घरक्राइमत्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन गुजरातकडे निघालेली लक्झरी बस पलटी

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन गुजरातकडे निघालेली लक्झरी बस पलटी

Subscribe

हरसूल : त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन निघालेल्या गुजरातकडे निघालेल्या लक्झरी बस शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी सहा वाजेदरम्यान हरसूल – पेठ महामार्गावरील खरपडी घाटात पलटी झाली. या अपघातात ३० जण किरकोळ जखमी व चार जण गंभीर जखमी झाले.

धार्मिक पर्यटनासाठी गुजरातमधील भाविक शुक्रवारी (दि.१२) खासगी बस (जी. जे ०३ बी. व्ही. ७०५८) ने त्र्यंबकेश्वरला आले होते. त्र्यंबकराजाचे दर्शन भाविकांनी घेतल्यानंतर सर्वजण धरमपूरमार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. बस सायंकाळी ५ वाजेदरम्यान हरसूल जवळील खरपाडे घाटात आली. भरधाव बसवर चालकाला नियंत्रण मिळवता न आल्याने बस रस्ता सोडून घाटातील उतारावर पलटी झाली. सुदैवाने घाटालगत खोल दरी नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या बसमध्ये ४० प्रवाशी होते. बस अपघातात 30 प्रवाशी जखमी झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तलाठी, पोलीस, डॉक्टर दाखल झाले. १०८ रुग्णवाहिकेमार्फत जखमींना ठाणेपाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -